• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दुधाला अनुदानाची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळली

Team OurAkola by Team OurAkola
May 21, 2020
in Featured, राज्य
Reading Time: 1 min read
79 0
0
देवेंद्र फडणवीस
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

फक्‍त 40 टक्केच सहकारी दूध संघांमार्फत संकलित होते. 60 टक्के दूध हे खासगी दूध संघांमार्फत संकलित होत आहे. जर दुधासाठी प्रतिलिटर अनुदान दिले, तर नवीन घोटाळे होतील. त्यामुळे दुधासाठी लिटरमागे अनुदान देणे शक्य नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. खा. राजू शेट्टी यांचे आंदोलन चुकीचे आहे. राज्य सरकारची चर्चेची दारे नेहमीच खुली असून, शेट्टींसोबत चर्चेची तयारी आहे, असेही ते म्हणाले.

पावसाळी अधिवेशनाच्या वृत्तसंकलनासाठी नागपूर येथे आलेल्या पत्रकारांशी ‘सुयोग’ निवासस्थानी ते म्हणाले, राज्य सरकारने दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी दूध भुकटी निर्यातीसाठी प्रतिकिलो 50 रुपयांचे अनुदान दिले आहे. त्यामुळे दुधाचे दर हे लिटरमागे तीन रुपयांनी वाढले आहेत. मात्र, लिटरमागे अनुदान देण्यात अडचणी आहेत.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

सरकारकडे खासगी दूध संघाकडून राज्यभर संकलित होणार्‍या दुधाची निश्‍चित आकडेवारी नाही. कर्नाटकमध्ये एकच दूध संघ असल्यामुळे तेथे लिटरमागे अनुदान देणे शक्य आहे. मात्र, राज्यात तशी परिस्थिती नसल्याने असे अनुदान देता येणार नाही. गुजरातमध्येही दूध भुकटीलाच अनुदान देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

राजू शेट्टी यांच्याबरोबर चर्चा करायला आम्ही तयार आहोत; पण त्यांना चर्चा करायची नाही, असे सांगतानाच या आंदोलनामुळे दूध पुरवठा खंडित होऊ नये म्हणून राज्य सरकारने आवश्यक ती काळजी घेतली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनावरून विरोधकही राजकारण करीत आहेत. सरकारच्या योजनांमध्ये स्वार्थी राजकारण आणून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिल्हा बँका आणि सहकारी संस्था या कशाप्रकारे भ्रष्टाचार करतात, हे सहकारमंत्र्यांनी मागील आठवड्यातच विधानसभेत समोर आणले, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘नाणार’वर ठाम; धर्मेंद्र प्रधान उद्धव ठाकरेंना भेटणार

नाणार प्रकल्पाबाबत बोलताना हा प्रकल्प व्हावा, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. सरकारने तीनवेळा सभागृहात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे समाधान होऊन कामकाज चालेल, अशी अपेक्षा बोलून दाखवितानाच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान हे पुन्हा उद्धव ठाकरे यांची भेटीची वेळ घेतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी प्रधान यांची भेट नाकारली होती. त्यावर याआधी वेळ मागितली होती; पण जमले नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच नाणार प्रकल्पाची जागा बदलण्याचा कोणताही प्रस्ताव नाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मंदिरांवर कब्जा करण्याचा हेतू नाही

मंदिरांवर कब्जा करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही. ज्या ठिकाणी लाखो भाविक दान देतात, तो पैसा समाजाच्या कामाला यावा, असा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आपले सरकार आल्यानंतर शिर्डी संस्थानचा भ्रष्टाचार थांबला, असेही ते म्हणाले.

अधिक वाचा : ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटीबध्द- पालकमंत्री रणजित पाटील

Tags: CM Devendra FadnavisMaharashtra
Previous Post

नीट मध्ये ‘शून्य’ गुण मिळूनही विद्यार्थ्यांना मिळाले अॅडमिशन

Next Post

चोहोट्टा बाजार ते करतवाडी रेल्वे धामना बु या गावाला जोडणारा रस्ता झाला खंड्डेमय

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
चोहोट्टा बाजार ते करतवाडी रेल्वे धामना बु या गावाला जोडणारा रस्ता झाला खंड्डेमय

चोहोट्टा बाजार ते करतवाडी रेल्वे धामना बु या गावाला जोडणारा रस्ता झाला खंड्डेमय

कोचिंग क्लासेस

खाजगी कोचिंग क्लासेस ना चाप लावणार - शिक्षणमंत्र्यांची घोषणा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.