अकोट (सारंग कराळे)– अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कला सागर ह्यांचे आदेशाने व अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजयकांत सागर व उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनोने ह्यांचे मार्गदएशनखाली आज दिनांक 16।7।18 रोजी अकोट शहर पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी पोलिस स्टेशन अकोट शहर च्या सावली सभागृहात शहरातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ऑटो चालकांची मीटिंग घेऊन त्यांना सुरक्षीत वाहतुकी संभधाने आवश्यक त्या सूचना दिल्या व कोणत्याही परिस्थिती मध्ये शालेय विद्यार्थी ऑटो ला लटकून किंवा आपले शरीर बाहेर राहील अश्या अवस्थेत प्रवास करणार नाही ह्या बाबत सूचना दिल्या तसेच एक आठवड्याच्या आत सर्व ऑटो चालकांनी खाकी ड्रेस घालणे सुरू करावे त्या नंतर त्यांचे ऑटो चलन केल्या जातील ह्या बाबत सक्त ताकीद दिली, ऑटो वाहतुकीस अडथळा होईल असे थांबवू नये व प्रवासी लोकांशी वागणूक सौजण्याची असावी अश्या सूचना दिल्या, सुचनेचे पालन न करणाऱ्या ऑटो चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल ह्या बाबत त्यांना समज देण्यात आली सदर मीटिंग मध्ये जवळपास 50 ऑटो चालक हजर होते, ह्या वेळी वाहतूक कर्मचारी ठाकूर, लापूरकर, फोकमारे हजर होते.