तेल्हारा (शुभम सोनटक्के)- तेल्हारा शहरातील मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्यांमुळे विद्यार्थी व नागरिकांना होत असलेल्या त्रास व अपघाता बाबत १६ जुलै ला तेल्हारा युवासेनेच्या वतीने शहरातील खड्ड्याची महापूजा करून मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन नगर परिषदेचे लक्ष वेधले .
तेल्हारा शहरातील बायपास चा प्रश्न अध्याप पर्यंत तेल्हारा नगर परिषद कडुन सुटू न शकल्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी झाली आहे तसेच विश्राम गृह ते माळेगाव नाका हा शहरातून जाणारा एकमेव मुख्य रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वरदळ राहते . परंतु सदर रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडल्या मुळे विद्यार्थांसह व वाहन चालकांना या रस्तांवरून जातांना मोठी कसरत करावी लागते अनेक वेळा या खड्ड्यांचा रस्त्यांमुळे मोठ मोठे अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही ,या खाड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे विद्यार्थांना ये- जा करण्याकरिता त्रास होत असून अपघात होत आहे .सदर रस्ता हा नगर परिषदच्या हद्दी मध्ये येत असल्यामुळे या रस्त्यांची संपूर्ण दुरुस्थी करण्याची जवाबदारी नगर परिषदची आहे नगर परिषदेने या कडे दुर्लक्ष केल्या मुळे युवासेना तेल्हारा च्या वतीने नगर परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी मुख्य रस्त्यावरील पाणी साचलेल्या खड्ड्याची महापूजा करण्यात आली व व तत्काळ खड्डे बुजवण्या बाबत पालीकेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले . रस्तांवर पडलेले खड्डे तत्काळ न बुजवण्यात आल्यास युवासेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला .
यावेळी युवासेना तालुका प्रमुख जयवंत चिकटे , युवासेना शहर प्रमुख सचिन थाटे ,युवासेना समन्वयक राम वाकोडे तालुका संघटक मुन्ना पाथ्रीकर , उपतालुका प्रमुख सदगुरु अकोटकर ,तालुका उपतालुका प्रमुख आशिष शेळके ,तालुका सरचिटणीस भैया देशमुख , ताकुला चिटणीस विशाल फाटकर ,शहर संघटक स्वप्नील सुरे ,शहर सरचिटणीस किशोर डामरे ,उपशहर प्रमुख राहुल पुदाखे , उपशहर प्रमुख प्रज्वल मोहोड , प्रसिद्धी प्रमुख विशाल नादोकार सागर इंगळे , गौरव धुळे ,सुरज काईगे अमित घोडेस्वार , वैभव देशमुख , आकाश पवार ,रोहित अग्रवाल ,गोविंद फुलवंदे ,वैभव कुचके आदेश महल्ले ,स्वप्नील इंगळे ,सौरभ कापसे प्रसाद देशमुख विशाल देशमुख मंगेश आखरे,नितीन आखरे , अक्षय गावंडे इत्यादी युवासेनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते .असे युवसेनेंचे प्रसिद्धी प्रमुख विशाल नांदोकार यांनी कळविले आहे