अकोट (सारंग कराळे) अकोला जिल्हयात सर्वञ मा. श्री एम. राकेश कलासागर पोलीस अधिक्षक अकोला जिल्हा याच्या मार्गदशनाखाली जिल्हयाभर तथा अकोट उपविभागात मा. श्री सुनिल सोनवणे साहेब उपविभागीय अधिकारी अकोट याच्या मार्गदशनाखाली महिलाच्या मुलाच्या मुलीच्या, जेष्ठ नागरीकाच्या सुरक्षीततेबाबत जननी =2हा कार्यक्रम सुरु आहे तर दुसरी कडे दिनांक 14 जुलै रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान वणी वारुळा फाट्याजवळ दोन अल्पवयीन मुली सकाळी 8 वाजता पासुन बसलेल्या व घाबरलेल्या परीस्थितीत रडत होत्या तेथे असलेले राजकुमार वानखडे का. वारुळा यानी प्रथम त्याना त्याना नांव पत्ता विचारला असता त्या सागंत नव्हत्या त्या घाबरत असल्याम़ु़ळे काहीच सागंत नव्हत्या त्यामुळे त्यानी कर्तव्यदक्ष नागरीका प्रमाणे आपले कर्तव्य बजावत अकोट ग्रामीण चे बिट अमंलदार पो कॉ विकास गोलोकार यानां फोनद्वारे माहीती दिली असता लगेचच पो. कॉ.विकास गोलोकार वारुळा फाटा येथे पोहचले व मुलीना विश्वासात घेवुन त्याची नावे विचारली असता त्यानी त्याचे नाव 1)कु. पुजा बाबुराव चव्हाण वय 10वर्ष (2)कु दुर्गा बाबुराव चव्हाण वय 7वर्ष दोन्ही रा. निभोरा. रा. रावेर जिल्हा जळगाव असे सागिंतले की आम्ही येथे कसे पोहचलो आम्हाला माहीत नाही आम्हाला सध्या राहत असलेले गाव सुद्धा माहीत नाही आम्ही आमच्या आबा आजी आई वडीला सोबत ईकडे आलो आहोत आमचे आई वडील शेतीचे अवजारे बनवन्याचे कामे करतात अशी माहीती मिळाल्यानतंर पो कॉ विकास गोलोकार यानी आजुबाजुच्या गावामधे असे शेतीचे अवजारे बनवनारे कुणी आहेत का चौकशी करत असताना मुंडगाव येथे अवजारे बववणारे आल्याची माहीती मिळाली. असता मुडंगाव येथे जावुन विचारपुस केली दोन्ही मुलीना त्याची आजी सौ. तुळजाबाई वामन चव्हाण वय 65वर्ष याच्या ताब्यात दिले व लछ ठेवण्याच्या सुचना दिल्या मुली घरी पोहचल्यावर मुलीच्या चेहरावरला आनंद पाहण्याजोगा होता आजी बाईनी पोलिसांना धन्यवाद दिला.