पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली,ज्येष्ठ नागरिकांची कार्यशाळा संपन्न
अकोला(प्रतिनिधी):- ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, सुरक्षा व आरोग्य या विषयातील विविध भेळसावणा-या समस्या व केंद्र आणि राज्य शासनाच्या लोकहितकारी योजनांची माहिती ज्येष्ठ नागरिकांपर्यत पोहचवावी यासाठी शासकीय अधिका-यांच्या माध्यमातून शासन आपल्या दारी या उदद्वदेशाने ज्येष्ठ नागरिकांची कार्यशाळा प्रमिलाताई ओक हॉल येथे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार चैनसुख संचेती, आमदार डॉ. रामदास आंबटकर, विजय पुराणीक, ज्येष्ठ रंगकमी राम जाध्व, माजी आमदार वसंतराव खोटरे, माजी आमदार जगन्नाथ ढोणे, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, डॉ. अशोक ओळंबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ज्येष्ठांचा सन्मान व त्यांनी केलेल्या कामाची कृतज्ञता व्यक्त करतांना पालकमंत्री डॉ. पाटील म्हणाले की, भारताच्या संविधानाप्रमाणे ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा ज्येष्ठ नागरकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांचा वृध्दापकाळ चांगलयारितीने घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसंय्य व्हावे, शारेरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे यासाठी राज्याने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहिर केले आहे. ज्येष्ठ नागरिकांची मर्यादा 65 वर्षावरुन 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जातस्त अशी करण्यात आली आहे, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटीबध्द आहे.
ज्येष्ठांचा सत्कार हा त्यांच्या सतकार्याचा सत्कार असून शासनाच्या योजना त्यांच्यापर्यत पोहचण्यासाठी शासनाच्या विविध विभागाने कार्य करावे. समाजामध्ये ज्येष्ठांना सन्मानाची वागणूक दयावी असे विचार विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार चैनसुख संचेती यांनी व्यक्त केले. यावेळी आमदार डॉ. रामदास आंबटकर, विवेक पुराणीक यांनीही आपले विचार मांडले.
यावेळी मिसाबंदीचा सत्कार स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देवून करण्यात आला. यात साहेबराव धोत्रे, विजयराव देशमुख, पुरुषोत्तम खोत, पंडीतराव कुळकर्णी, जयप्रकाश पांडे, दिवाकर पत्की, रामदास कोल्हे, मधुकरराव आसरकर, मुकुंदराव बोबडे, बालकिसन तिवारी, उषाताई शहा, ताराबाई हातवळणे यांचा समावेश होता. यावेळी जिवन गौरव पुरस्कार देवुन ज्येष्ठ नागरिकांना सन्मानीत करण्यात आले. यात नानासाहेब चौधरी, डॉ. आर. एन. भांबुरकर, डॉ. राठी, ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव, रतनलाल खंडेलवाल, नानासाहेब उजवणे, जयकिसन डागा, देवकुमार मुधोळकर, कन्हैययालाल रंगवाणी, मधुकरराव सरग, पुरुषोत्तम परनाटे, नाना कुळकर्णी यांचा समावेश होता.
पोलीस विभागातर्फे पोलीस निरिक्षक गजानन शेळके यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सोयी सवलतीबाबत माहिती दिली. यावेळी सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून पीपीटीव्दारे ज्येष्ठांच्या विविध योजनाबाबतची माहिती देण्यात आली. जिल्हा प्रशासनातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला जिल्हयातील विविध ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेचे पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक व माजी महापौर उज्वलाताई देशमुख, माजी नगराध्यक्ष हरीष अलीमचंदाणी, नगर सेवक आशिष पवित्रकार, ॲङ सुभाषसिंग ठाकूर, बंडु पंचभाई,