अकोला(प्रतिनिधी)- आज सकाळी सुलतानपुर (कार्ली) ता.मुर्तीजापुर येथील धरणातील चिंचेच्या व निबांच्या झाडावरील आठ दीवसापासुन अडकलेल्या सात माकडांना आणी पाच माकडाच्या पिलांना संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी रेस्क्यू रबर बोटच्यासय्याने आणी रोप क्लायबींग शीळी तयार करुन सर्व माकडांना सुखरूप बाहेर काढले. सुलतानपुर हे गाव धरणात गेल्यामुळे हे धरण पहील्याच वर्षी भक्कमपणे भरल्यामुळे हे माकड याठिकाणी झाडावर होते. अचानक मागील आठवडय़ात भरपुर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे भरले. आणी ज्या झाडावर आणी घरावर माकडं बसलेली होती त्याच्या आजूबाजूला एक की.मी. पर्यंत पाणीच पाणी आणी वीस फुट खोल असल्याने त्या माकडांना बाहेर जाण्यासाठी मार्ग नव्हता त्यामुळे कार्ली आणी जामठी येथील नागरिकांनी व फाॅरेस्ट कर्मचारी यांनी सत गाडगेबाबा आपत्कालीन पथाकाचे दीपक सदाफळे यांना दीली.
लगेच माहीती मिळताच दीपक सदाफळे यांनी आपले जवान व पथकाचे रेस्क्यू वाहन शोध व बचाव साहीत्यासह घटनास्थळ गाठले आणी सर्च ऑपरेशन चालु केले. धरणात हे रेस्क्यू ऑपरेशन सकाळी अकरा वाजता पासुन पाच वाजेपर्यंत चालले. यामध्ये पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वात ऋषीकेश तायडे, ओम साबळे, आशीष मुळे, मयुर जवके, राहुल जवके, महेंद्र बोळे, मनोज उमाळे, गोविंदा ढोके, वन्यजीव र. बाळ काळणे, प्रफुल्ल धारपवार, प्रतीक कलाके, यांनी ऑपरेशन यशस्वी केले, यावेळी फाॅरेस्ट चे वनपरीक्षत्र अधिकारी, वनपाल जी.डी.इंगळे, वनरक्षक पि.डी.हरणे, तलाठी राजेश खंडारे , हे हजर होते. यावेळी भैया काकोडे यांचेही सहकार्य लाभले.