- अकोट डेपो मॅनेजर यांचे शिवसेना गटनेते मनिष कराळे यांना आश्वासन..
अकोट (सारंग कराळे)- गेली कित्येक दिवसांपासून अकोट आगार ची अकोट ते उमरा,मक्रमपूर,शहापूर,बेलुरा,जितापुर येथे जाणारी एस.टी.बस सेवा काही दिवसांपासून बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे.विध्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी अकोट येथे तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.परंतु काही दिवसांपासून सुरळीत सूरु असलेली एस.टी.बस सेवा बंद पडलेली आहे.त्यामुळे संबंधित परिसरातील विध्यार्थ्यांनी आज आपली तक्रार घेऊन शिवसेना गटनेते तथा सभापती मनिष रामाभाऊ कराळे यांचे जनसंपर्क कार्यालय गाठले तेव्हा मनिष कराळे यांनी त्यांची तक्रार ऐकून घेतली व क्षणाचा विलंब न करता शिवसेना संपर्क प्रमुख अरविंद सावंत साहेब,मा.आ.गोपिकीशन बाजोरिया,सहाय्यक संपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर, मा.आ.संजय गावंडे,जिल्हाप्रमुख नितीनबाप्पू देशमुख,जिल्हा संघटिका सौ.मायाताई म्हैसने यांच्या मार्गदर्शनात त्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन अकोट बस स्टँड येथील डेपो मॅनेजर चे कार्यालय गाठले.त्यांच्याशी या विषयांवर सविस्तर चर्चा केली व विद्यार्थ्यांसाठी न्याय मागितला त्यावेळी डेपो मॅनेजर श्री.जोशी साहेबांनी बोलतांना सांगितले की त्या भागात २ दिवसांपूर्वी केलेल्या सर्वेवर अकोला येथील वरिष्ठांशी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता… येणाऱ्या २ दिवसात खंडित बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात येईल अशी माहिती दिली.यावेळी युवासेना तालुका संघटक कुनाल कुलट,विद्यार्थी प्रतिनिधी शिवा रेळे,युवासेना उपतालुका प्रमुख अंकुश कुलट,जेष्ठ शिवसैनिक विजू भाऊ ढेपे,युवासेना शहर सरचिटणीस नारायण पोटे,धनंजय गावंडे,कुणाल खवले,रोहित रंधे, रोहित धोंडेकर,वैभव जगताप,सागर कराळे,मयूर भगत,तेजा पालेकर,पंकज पालेकर,आकाश शेरेकर,मुन्ना वानखडे,अजय पुरी तसेच शिवसैनिक युवासैनिक बहुसंख्य शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.