रशिया : फिफा विश्वचषकाच्या इतिहासात पाहिलांदाच क्रोएशिया नं फायनल मध्ये धडक मारून नवा इतिहास रचला आहे. उपांत्य सामन्यात इंग्लंड चा २-१ असा पराभव करून भल्याभल्यांचा अंदाज खोटा ठरवलाय.
आता १५ जुलै रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात क्रोएशियाला बलाढ्य फ्रान्स सोबत मुकाबला करावा लागणार आहे.
सामन्याच्या सुरवातीपासून इंग्लंड ने आक्रमक खेळ खेळाला. इंग्लंड च्या किरन ट्रीपियर न फ्री किक वर गोल करून पाचव्या मिनिटाला च इंग्लंड च खातं उघडलं. हा गोल करून त्याने इंग्लंड ला आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात क्रोएशियाला एकही गोल करता आला नाही. उत्तरार्धात मात्र क्रोएशियाने जोरदार आक्रमण केले.
वारलासको च्या क्रॉसवर पेरिसिचने क्रोएशियाला ६८ व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. इंग्लंड क्रोएशियातील कोंडी निर्धारित वेळेत फुटू शकली नाही. त्यामुळे सामना १५-१५ मिनिटाच्या जादा वेळेत खेळवण्यात आला.
पेरिसिचने १०९ व्या मिनिटाला हेडर वर दिलेल्या पासवर मारिओ मानझुकीच ने क्रोएशिया चा दुसरा गोल लावला. याच गोल ने क्रोएशिया ला २-१ अशा विजयासह फायनल मध्ये तिकीट मिळवून दिल.
अधिक वाचा : रोहित शर्मा च्या शतकी खेळीने टीम इंडियाने टी-२० मालिका जिंकली