अकोट (सारंग कराळे)- अकोट शहरात सर्वीकडे कचराचे ढिगामुळे घाणीचे साम्राज्य पसरले असुन शहरातील मुख्य रस्तासह गल्ली बोळीतील रोडवर पाण्याचे साचलेले डबके व गटारे यामुळे अंतर्गत रस्ताची ऐशीतैशी झाली आहे. ठिक ठिकाणी कचराचे ढिग पडले असुन आठवडी बाजाराची तर दयनीय अवस्था आहे पुर्ण बाजारात गटारामुळे पायदळ चालणे मुश्किल झाले आहे.
यामुळे साथीच्या रोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच अकोट नगर पालिकेच्या आरोग्य विभाग व इतर सबंधीत अधिकारी ह्यांनी कुठल्याच प्रकारचे पावसाळ्या पूर्वी उपाययोजना केल्याचे दिसुन येत नाही तरी नव्याने रुजु झालेले मुख्याधिकारी प्रशांत खोडे यांच्यासमोर शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे यानीं आठवडी बाजारातील भाजी पाला विक्रेते यांच्या समस्या मांडल्या असता मुख्यधिकारी यानी दखल घेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे याच्या सोबत जावुन आठवडी बाजाराची पाहणी केली व भाजी विक्रेता याच्या समस्या जाणुन घेतल्या व त्या लवकरच सोडवण्याचे आश्वासन सुद्धा दिले आहे.
माञ दुसरी कडे विकासाच्या नावावर अच्छे दिन आयेंगे चे नारे देणारे व सत्ता मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करुन ५ कोटी रु चा विशेष पेकेंज अकोट शहरासाठी आणला होता परंतु त्या निधीमधले ऊदघाटन केलेले अनेक रोड सुद्धा अजुन त्याच्या अच्छे दिनाची वाट पाहत आहेत मोठया थाटा माटाने ऊदघाटन केली व नगर पालिकेत मोठया अपेक्षेने अकोटकर जनतेने एक हाती सत्ता सुद्धा दिली तरी आज रोजी अकोट कराच्या वाटेला सत्ताधारी गाजर देत असल्याचे चिञ दिसुन येत आहे ?
कारण अकोट नगर पालिकेत सत्ताधार्यानी आज पर्यत १५० चा वर ठराव घेतले असुन या कामासाठी कोटी रुपयाचा निधी सुद्धा पडुन आहे माञ नियोजना अभावि एकही काम मार्गी लागले नाही या विषयावरुन सत्ताधारी पक्षाचे गटनेते नगर सेवक व अध्यक्ष याच्यात आम सभेमध्ये खडाजंगी झाली होती कारण आप आपल्या प्रभागातील नागरीक नगरसेवकाना विकासाच्या नाववर जाब विचारत आहेत तर अध्यक्ष सर्व खापर तत्कालीन मुख्यधिकारी याच्यावर फोडत आहेत परंतु सत्ताधारी नगरसेवकासह अध्यक्षात अशा गटबाजी पणामुळे अकोट कराना नरक यातना सहन कराव्या लागत आहेत.
हे माञ खरे तर दुसरी कडे विकास महर्षि लोकप्रतीनिधी मौन व्रत धारण करणे अकोट शहराच्या विकासा साठी योग्य नसल्याची भावना नागरीकात आहे त्यामुळे नक्की पाणी कुठ मूरत आहे हे समजण्यास मार्ग नाही अकोट शहरात विकास कुठ होत आहे दिसुन येत नाही ? माञ यामधे सामान्य अकोट कर जनता नाहक भरडल्या जात आहे तर दुसरीकडे आज तरी अकोट नगर पालिका प्रशासन नागरीकाना मूलभूत सुविधा सुद्धा पुरवण्यास अपयशी ठरत आहे ? यात शंका नाही.
*(शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप भाऊ बोचे यानी न पा अकोट ला 7 दिवसाच्या आता आठवडी बाजारातील भाजीपाला विक्रेत्याची समस्या दुर न केल्यास बाजार अकोट नगर पालिकेत बाजार बसवण्याचा इशारा दिला आहे.)