तेल्हारा(प्रतिनिधी)- शहरातील वाहतूक व्यवस्था बघता खूप बिकट झाली असून ज्याला जिथे वाटेल तिथे वाहन उभे करण्याची रीत शहरात लागली आहे.अशातच नव्याने रुजू झालेले तेल्हारा पोलीस स्टेशन चे ठाणेदार विकास देवरे यांनी अशा बेताल वाहतुकीवर लगाम लावण्यासाठी मोहीम राबविने सुरू केले असून वाहनधारकांसह ज्या दुकान धारकांच्या दुकानासमोर वाहन असतील अशा दुकांधारकांवर सुद्धा कारवाई करण्यात येणार असल्याचे ठाणेदार देवरे यांनी सांगितले.
तेल्हारा पोलीस स्टेशन गेल्या कार्यकाळात होऊन गेलेल्या काही ठाणेदारांनी शहरातील वाहतुकीवर तसेच अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांवर अंकुश लावला होता मात्र गेल्या वर्षभरापासून जैसे थे परिस्तिथी निर्माण झाल्याने नागरिकांच्या सोई करीता तेल्हारा पोलिसांनी वाहतुकीस अडथडा निमार्ण होईल अशा वाहनधारकविरुद्ध कारवाई केल्या जाणार आहे तरी वाहनधारकांनि तसेच दुकान धारकांनि कारवाई पासून वाचण्याकरिता पोलिसांना सहकार्य करून आपली वाहने अडथडा निर्माण होणार नाही अशा पद्धतीने पार्कींग करावी.