केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी देशातील सहा प्रतिष्ठीत शैक्षणिक संस्थांची नावे जाहीर केली. आश्चर्याची बाब म्हणजे यामध्ये अजून स्थापनही न झालेल्या जिओ इन्स्टिटयूट ला सर्वोत्तम शैक्षणिक संस्थेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. या सहा उच्च शिक्षण संस्थांमध्ये तीन सरकारी आणि तीन खासगी शिक्षण संस्था आहेत.
Congratulations to @ManipalUni, @bitspilaniindia & Jio Inst for getting status of #InstituteofEminence. #TransformingEducation #48MonthsOfTransformingIndia@PIB_India @MIB_India pic.twitter.com/XpRsm8nxIQ
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) July 9, 2018
देशातील प्रतिष्ठीत शैक्षणिक संस्थांमध्ये आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली, आयएसएससी बंगळुरु या तीन सरकारी संस्था आहेत तर खासगी क्षेत्रातून मनिपाल अॅकेडमी ऑफ हायर एज्युकेशन, बिट्स पिलानी आणि जिओ इन्स्टिटयूट या तीन संस्था आहेत. यातील जिओ जिओ इन्स्टिटयूट अजून सुरुही झालेली नाही.
रिलायन्स फाऊंडेशनच्यातंर्गत जिओ इन्स्टिटयूची स्थापना होणार असून रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रमुख आहेत. सरकारकडून करण्यात आलेल्या या घोषणेमुळे जन्माआधीच जिओ इन्स्टिटयूला सरकारचे उच्च शिक्षणाचे जे नियम आहेत त्यातून सवलत मिळाली आहे.
अधिक वाचा : रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नोकरी ची सुवर्णसंधी