जगप्रसिद्ध ताजमहाल (आग्रा ) मध्ये नमाज पढण्याची परवानगी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने स्पष्ट केले की ही वास्तू सात आश्चर्यापैकी एक आहे. त्यामुळे येथे नमाज पढता येणार नाही.
ताजमहालमध्ये नमाज पढण्याची परवानगी द्यावी, अशी याचिका येथील आग्रातील स्थानिक नागिरकांनी केली होती. याचिकेत स्थानिक लोकांसोबत बाहेरच्या लोकांना देखील नमाज पढण्यास द्यावे असे म्हटले होते.
ताजमहालमध्ये एक मस्जिद असून येथे प्रत्येक शुक्रवारी नमाज होते. यावरून अनेक वेळा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळेच प्रत्येक शुक्रवारी ताज महाल पर्यटकांसाठी बंद असतो. गेल्यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाग असलेल्या भारतीय इतिहास संकलन समितीने ताज महालमध्ये शुक्रवारी होणारी नमाज बंद करावी, अशी मागणी केली होती. जर नमाज बंद केली नाही तर शिव चालीसा वाचण्यास परवानगी द्या, असे ABISSने म्हटले होते.
भाजपच्या अनेक नेत्यांनी ताजमहाल विषयक वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. ताजमहाल हे शिव मंदिर असल्याचे काहींनी म्हटले आहे तर काहींच्या मते हा तेजोमहालय आहे.
अधिक वाचा : गँगस्टर मुन्ना बजरंगी ची बागपत तुरुंगात हत्या