अकोला :- जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शेतकरी आत्मघातग्रस्त कुटूंबातील महिलांनी निर्माण केलेल्या कापडी पिशव्या खरेदी करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवतेल प्रतिष्ठाण या संस्थेकडून 500 कापडी पिशव्या खरेदी करण्याची प्रथम मागणी नोंदविण्यात आली.
अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या दालनात आज शिवतेज प्रतिष्ठाणचे योगगुरू मनोहरराव इंगळे यांनी 500 कापडी पिशव्या खरेदी करण्याचे मागणीपत्र अपर जिल्हाधिकारी यांना दिले.
यावेळी शिवतेज प्रतिष्ठाणचे रेवलनाथ जाधव, प्रकाश म्हस्के , बी. यू. इंगळे, रामप्रकाश मिश्रा , गजाननराव इंगळे, जसवंतसिंह मल्ली, जी. पी.कठाळकर, अनुराधा इंगळे, वंदना तायडे, शालिनीताई राठोड, व शिवतेज इंगळे यांची उपस्थिती होती.
सदयस्तिथीमध्ये प्लॅस्टीक बंदी झाल्यामुळे कापडी पिशव्यांची मागणी होत असल्याच्या प्रमाणात कापडी पिशव्यांचा पुरवठा होत नाही. कापडी पिशव्या पर्यावरणाला पुरक आहेत. कापडी पिशव्याच्या वापरला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
दुसरीकडे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबातील महिलांना शिलाई मशिनचे वाटप यापुर्वी विविध सामाजिक उपक्रमामधुन करण्यात आलेले आहे. तथापी ग्राहकांचा ओढा हा नामांकित शिवण काम करणा-या कडे असल्यामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबातल महिलांना या शिलाई मशिनच्या माध्यमातुन फारसा मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होवू शकलेला नाही.
प्लॅस्टीक बंदीमुळे वाढलेली कापडी पिशव्यांची मागणी शिवणकाम करू शकणा-या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबातील महिलांच्या माध्यमातून पुर्ण करण्याचा नाविन्य पुर्ण उपक्रम अकोला जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेला आहे. याकरिता “वावर” या उपक्रमाच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जात आहे. वावर ही जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांची संकल्पना असुन उपजिल्हाधिकारी राजेश खवले हे या उपक्रमाचे नोडल अधिकारी आहेत.
अकोला जिल्हयातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबातील महिलांना कापडी पिशव्या शिवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या महिलांनी निर्माण केलेल्या कापडी पिशव्या बाजार भावाने खरेदी करण्याची हमी अकोला जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. ज्या महिला या उपक्रमात भाग घेऊ इच्छितात त्यांनी उपजिल्हाधिकारी श्री राजेश खवले यांचे मोबाईल क्रमांक 9850345176 वर संपर्क साधून नाव नोंदवावे असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबातील महिलांव्दारा उत्पादित केल्या जाणा-या कापडी पिशव्या मोठया प्रमाणात खरेदी करून नागरीक , सेवाभावी संघटना व सामाजिक संघटना यांनी या उपक्रमांस हातभार लावावा असे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.
अधिक वाचा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदावर डॉ. मुरहरी केळे रुजू