अकोला : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदावर डॉ. मुरहरी केळे रुजू झाले असून, ३ जुलै रोजी त्यांनी पदभार स्विकारला. रुजू होण्यापूर्वी ते मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनी येथे संचालक (तांत्रिक) पदावर कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी नागपूर मंडळ येथे अधिक्षक अभियंता तथा टोरॅट पॉवर, भिवंडी येथे व्यवस्थापक पदावर तसेच प्रकाशगड, मुंबई येथे वितरण व वाणिज्यिक विभागात मुख्य अभियंता म्हणून कार्य केले आहे. सोबतच कार्यकारी संचालक(मा.सं.) पदाचा प्रभार सुद्धा सांभाळला आहे.
डॉ. मुरहरी केळे हे साहित्यिक असून त्यांची ५ मराठी व २ इंग्रजी पुस्तके प्रकाशित झाली आहे. तसेच राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय स्तरावर रिसर्च पेपर प्रसिध्द झाली आहेत, यामध्ये हॉवर्ड विद्यापीठ बोस्टन येथे ‘स्मार्ट मीटर’ या विषयावर सुद्धा पेपर प्रसिध्द झाला आहेत. याशिवाय वृत्तपत्र आणि नियतकालिकांमधून विविध विषयांवर त्यांचे शंभरहून अधिक लेख प्रकाशित झाली आहेत. सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक व प्रशासकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. मराठी चित्रपटात त्यांनी अभिनय सुद्धा केला आहे.
मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांची बदली झाल्यानंतर मुख्य अभियंता पदाचा प्रभार बुलडाणा मंडळाचे अधिक्षक अभियंता गुलाबराव कडाळे यांचेकडे होता. आज डॉ. मुरहरी केळे हे रुजू झाल्यानंतर त्यांचे अभियंते, अधिकारी, कर्मचारी व विविध संघटनांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
अधिक वाचा : पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद