*शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याचे नुकसान होऊ देणार नाही
*कापसावरील गुलाबी बोन्ड अळी च्या एकात्मिक कीड नियंत्रणासाठी
* “युवाराष्ट्र” च्या धडपडीला डॉ.पं. दे.कृ. वि.अकोला चा भक्कम प्रतिसाद!
अकोला(प्रतिनिधी)-डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला “युवाराष्ट्र” च्या गुलाबी बोन्ड अळी च्या एकात्मिक नियंत्रणाच्या विदर्भातील धडक व व्यापक मोहिमेसाठी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला तांत्रीक पाठबळ साठी भक्कम पणे सोबत उभे राहणार असून “युवाराष्ट्र”च्या या कालसुसंगत प्रयासांचे कुलगुरू डॉ.विलास भाले यांनी प्रकल्पाचे भरभरून कौतुक केले.”युवाराष्ट्र” चे डॉ निलेश पाटील व विलास ताथोड यांनी या प्रकल्पाबाबत कुलगुरू डॉ. विलास भाले, संशोधन संचालक डॉ विलास खर्चे, किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.उंदिरवाडे,प्रा.डॉ प्रशांत नेमाडे आदींसह 3 बैठका झाल्या असून डॉ पं. दे.कृ. वि अकोला चे सर्व संशोधन व तंत्रज्ञान व उपक्रमा दरम्यान जनजागरणा साठी तज्ञाची उपस्थिती या बाबत भक्कमपणे सोबत राहू असा मोठा पाठींबा डॉ पं दे कृ वि अकोला च्या मान्यवरांनी “युवाराष्ट्र” च्या उपक्रमाला दिला आहे.