• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 5, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला शहर

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद

Team OurAkola by Team OurAkola
April 30, 2020
in अकोला शहर, Featured
Reading Time: 1 min read
79 1
0
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद
11
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. दि. 02 जुलै 2018 रोजी झालेल्या या उपक्रमात विविध विभागांच्या 193 तक्रारी प्राप्त झाल्या. विशेष म्हणजे स्वत: पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी नवीन तक्रार घेऊन आलेल्या उपस्थित नागरिकांकडे जाऊन त्यांच्या तक्रारी स्विकारल्या. यावेळी त्यांनी तक्रारदारांची सहानुभूतीपूर्वक चौकशी करुन तक्रारींचा 15 दिवसाच्या आत निपटारा करण्यात येईल, असा दिलासाही तक्रारकर्त्याना दिला.

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

जनतेच्या तक्रार निवारण सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक एम, राकेश कलासागर, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उदयसिंह राजपूत, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेद्र निकम, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी उज्वल चोरे आदींसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद

सर्वप्रथम पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी नवीन आलेल्या अर्जदारांचे निवेदने जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय व इतर अधिका-यांसोबत स्वत: तक्रारकर्त्याकडे जावून स्विकारले. 15 दिवसाच्या आत सबंधीत विभागाकडून आपणास आपल्या तक्रारीवर काय कार्यवाही करण्यात आली या बाबतचा अनुपालन अहवाल कळविण्यात येईल. अशी तक्रारकतर्यांना ग्वाही दिली. व संबंधीत अधिका-यांना तशा सुचना दिल्यात. जनतेच्या तक्रारीचे व्यवस्थीत समाधान व्हावे हा या उपक्रमामागचा उददेश असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले.

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद

मागील सभेत प्राप्त झालेल्या जुन्या तक्रारींचा विभागवारआढावा घेतला. यात महसुल, जिल्हा परिषद , मनपा , पोलीस विभाग , महावितरण , कृषी , सहकार आदी विभागाचा समावेश हेाता. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधीत विभागाच्या तक्रार कर्त्यांचा नावाचा पुकारा केल्यानंतर प्रत्यक्ष संबधीत विभागाच्या अधिका-यांसमोर समक्ष तक्रार कर्त्यांची तक्रार जाणून घेवून या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली. याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून त्यांनी जाणून घेतली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पंधरा दिवसांत कोणत्याही परिस्थितीत तक्रारींचे निराकरण करावे. तक्रारीवर काय कारवाई केली. याबाबतच्या अुनपालनाची प्रत आपल्याला व संबंधित तक्रारदाराला वेळेत देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले. तसेच पालकमंत्री म्हणाले की, प्रशासनाकडून समस्या तातडीने सोडविल्या गेल्या पाहिजे अशी जनतेची अपेक्षा असते, तक्रार प्राप्त झाल्यावर त्याबाबतची प्राथमिक माहिती घेवूनच अधिकाऱ्यांनी जनता दरबारात उपस्थित राहावे, असेही ते म्हणाले.

आज झालेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेत एकूण 193 तक्रारी जनतेकडून प्राप्त झाल्या. यामध्ये वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या तक्रारींचा समावेश होता. विविध विभागांच्या कामांबाबतच्या लेखी स्वरूपातील तक्रारी नागरिकांनी पालकमंत्री यांना दिल्या. तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधित विभागाप्रमुखांकडे विचारणा करुन त्याचे त्वरित निराकरण करण्याबाबत सूचित केले. तत्पुर्वी पालकमंत्री यांनी मागील सभेत प्राप्त तक्रारींवर अधिका-यांनी काय कार्यवाही केली याबाबत चौकशी केली. झालेल्या कार्यवाहीवर तक्रारदारांचे समाधान झाले का, याची विचारणा त्यांनी तक्रारदारांना करुन पुढील तक्रारी स्विकारण्यास सुरुवात केली.

विभागनिहाय प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपशील पुढील प्रमाणे आहे, महसूल विभाग – 40 तक्रारी, पोलीस विभाग—17, जिल्हा परिषद–54, महानगर पालिका– 06, भूमी अभिलेख – 07, अग्रणी बँक – 10, कृषी विभाग – 10, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था -16, विद्युत विभाग –03, जिल्हा विपणन अधिकारी – 07, इतर – 23 अशा एकुण 193 तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या.

अधिक वाचा : अकोट पोलीस स्टेशनचे ठाणेदार शेळके यांचे अकोट शहरवासीयांना आवाहन

Tags: AkolaDr. Ranjit PatilEvents in Akolaजनता तक्रार निवारण
Previous Post

आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-5 लवकरच भारतीय सैन्याच्या ताफ्यात

Next Post

रणबीर कपूर च्या ‘संजू’ने Box Office वर ‘बाहुबली 2’ ला टाकलं मागे

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
रणबीर कपूर च्या 'संजू'ने Box Office वर 'बाहुबली 2' ला टाकलं मागे

रणबीर कपूर च्या 'संजू'ने Box Office वर 'बाहुबली 2' ला टाकलं मागे

होय आम्ही प्रत्येक परिस्थितीत बळीराजाच्या सोबत आहोत! “युवाराष्ट्र” च्या धडपडीला डॉ.पं. दे.कृ. वि.अकोला चा भक्कम प्रतिसाद

होय आम्ही प्रत्येक परिस्थितीत बळीराजाच्या सोबत आहोत! "युवाराष्ट्र" च्या धडपडीला डॉ.पं. दे.कृ. वि.अकोला चा भक्कम प्रतिसाद

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.