कार्तिक आर्यन – क्रिती सॅनॉन ची जोडी ‘लुका छुपी’मध्ये झळकणार
‘सोनू के टिटू की स्विटी’ या धमाकेदार चित्रपटानंतर अभिनेता कार्तिक आर्यन आणखी एका रोमकॉमसाठी सज्ज झाला आहे. ‘लुका छुपी’ या आगामी चित्रपटात तो क्रिनी सनॉनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उटेकर करत असून दिनेश विजन निर्माते आहे.
Kartik Aaryan and Kriti Sanon teamed in #LukaChuppi… Directed by Laxman Utekar… Produced by Dinesh Vijan… The story travels from Mathura to Gwalior and Agra… Kartik enacts the part of the star reporter of a local TV channel… March 2019 release… Official announcement: pic.twitter.com/niuW1woeXz
— taran adarsh (@taran_adarsh) July 2, 2018
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्विटरच्या माध्यमातून याविषयीची माहिती दिली आहे. यामध्ये कार्तिक एका स्थानिक न्यूज चॅनलचा स्टार रिपोर्टरची भूमिका साकारणार आहे. पुढच्या वर्षी मार्चमध्ये ‘लुका छुपी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Next ? ? #LukaChuppi
Super excited ❤❤@kritisanon #dineshvijan #laxmanutekar @MaddockFilms pic.twitter.com/vltRKTGmxy— Kartik Aaryan (@TheAaryanKartik) July 2, 2018
सुरुवातीला ‘मथुरा लाइव्ह’ हे शीर्षक चित्रपटासाठी सुचवण्यात आलं होतं. मात्र अखेर ‘लुका छुपी’ हे नाव अंतिम करण्यात आल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे. कार्तिक आणि क्रिती सॅनॉन ही नवी जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ आणि ‘सोनू के टिटू की स्विटी’ यांसारख्या चित्रपटांमधून कार्तिकने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. क्रिती सनॉनच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, तिने नुकतंच ‘अर्जुन पटियाला’चं शूटिंग पूर्ण केलं आहे. यामध्ये ती अभिनेता आणि गायक दिलजित दोसांजसोबत झळकणार आहे.
अधिक वाचा : संजू – व्यक्ती एक रूप अनेक, संजय दत्तचा प्रवास