हिवरखेड(बलराज गावंडे)-:लोकजागर मंचाच्या शहर कार्यालय लोकार्पण आणि विद्यार्थी संवाद या कार्यक्रमाला प्रख्यात हास्य अभिनेते,चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे हे रविवारी उपस्थित राहणार आहेत.
1 जुलै रोजी दुपारी 3 वाजता येथील विठ्ठल मंदिर सभागृहात हा कार्यक्रम होत असून यावेळी लोकजागर मंचाचे संस्थापक अनिल गावंडे, कार्याध्यक्ष ऍड सुधाकर खुमकर,उपाध्यक्ष अशोक घाटे सरचिटणीस पुरुषोत्तम आवारे आणि पंचायत समिती सदस्य मनीष भांबुरकर हे उपस्थित राहणार आहेत,स्पर्धा परीक्षा वाचनालय तसेच चण्डिका चौकातील लोकजागर मंच कार्यालयाचे उदघाटन झाल्यावर भारत गणेशपुरे हे विट्ठल मंदिर सभागृहात विद्यार्थी संवाद कार्यक्रमात इंग्लिश स्पिकिंग कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करतील या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मनीष भुडके,महेंद्र कराळे यांनी केले आहे.
-जाहिरात-