हिरावून घ्या हक्क जगण्याचाही
यातना भोगायच्या जर बारमाही
पावसा तुझीही मी तक्रार देतोय,
न्यायाधीशासम तूही वागला नाही
तुझ्याकडे प्रेमाचा गुलाब असू दे,
माझ्याकडे विरही पाकळ्या काही
कशा कशाचा तरी अभ्यास करता
जणू विद्यापीठ भासे वर्षा बंगलाही
आचरणात कुठे महान शिकवण?
भाईच हिंदू मुस्लिम शीख ईसाई!
अब्दुल हकीम ( अंबड )