अकोला ता.२९ : पत्रकारांच्या पाटण मेळाव्याला प्रतिसाद, राज्यातील ३५४ जिल्हातून १ हजार प्रतिनिधींची उपस्थिती
मराठी पत्रकार परीषदेच्या वतीने सातारा जिल्हातील पाटण येथे आयोजित पत्रकार संघांच्या तालुका अध्यक्षांच्या मेळाव्यात राज्यातील ३५४ जिल्ह्यातुन आलेल्या सुमारे १ हजार प्रतिनिधीची उपस्थिती होती. मेळाव्यात अकोला जिल्ह्यातील पत्रकारांचा देखील सहभाग होता.
मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख, किरण नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांच्या मार्गदर्शनात सातारा जिल्हा पत्रकार संघ व पाटण तालुका पत्रकार संघाने हा मेळावा आयोजित केला होता.
या मेळाव्यात स्व. शंकरराव चव्हाण कल्याण निधीचा लाभ अधिस्विकृतीधारक पत्रकाराप्रमाणेच सर्व पत्रकारांना देण्यात यावा, मध्यम व लहान वृत्तपत्रांच्या पडताळणी संदर्भातील जाचकअटी रद्द कराव्यात, शासकीय जाहीरात दरामध्ये सरसगट शंभर टक्के वाढ करण्यात यावी, तसेच ग्रामीणपत्रकारांना अधिस्विकृतीपत्रीकादेण्यात यावी आदी मागण्यांचे ठराव या मेळाव्यात पारीत करण्यात आले.
या मेळाव्यात अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजुरकर, तसेच पत्रकार संघाचे जिल्हातील प्रतिनिधी प्रल्हाद ढोकणे, दिलीप देशमुख,अनंत अहेरकर, दीपक जोशी,सदानंद खारोडे, सत्यशील सावरकर, गणेश सोनटक्के, सुरेश सिसोदीया, जनार्दन चतारे, विलास बेलाडकर आदींनी सहभाग घेतला होता.
अधिक वाचा : लोकजागर मंचाचा उपक्रम धमाका, अभिनेते भारत गणेशपुरे तेल्हाऱ्यात