* न प प्रशासनाची कारवाई
* व्यावसायिकांनी घेतला प्लास्टिक पिशवी बंदीचा धसका
* अनेक दुकानदारांनी ठेवली आपली दुकाने बंद
तेल्हारा- गेल्या २५ तारखेपासून नगर परिषद प्रशासनाकडून स्थापन केलेल्या पथकाकडून कारवाईचा सपाटा सुरू असून व्यावसायिक यांच्या दुकानांची झाडाझडती घेऊन प्लास्टिक वापणाऱ्या दहा व्यावसायिकांकडून ५० हजार दंड वसूल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने २३ जून पासून प्लास्टिक पिशवी वापरास बंदी घातली असल्याने प्लस्टिक पिशवी बंदी घातलेल्या वस्तू आढळल्यास प्रथम पाच हजार,दुसऱ्या वेळेस दहा हजार,तिसऱ्या वेळेस पंचवीस हजार व सहा महिने कारावास अशा प्रकारची कारवाई व दंड वसूल करण्यात येणार आहे. तेल्हारा नगर परिषद चे मुख्याधिकारी मनोहर आकोटकर यांच्या आदेशाने एक पथक तयार करण्यात आले.हे पथक गेल्या तीन दिवसांपासून शहरातील दुकानदार फेरीवाले यांची झाडाझडती घेत असून प्लास्टिक पिशवी व बंदी घालण्यात आलेल्या वस्तू वापणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत असून आज शहरातील १० दुकानदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून ५० हजार दंड वसूल करण्यात आला. सदर कारवाई न प प्रशासनामधील पथक प्रमुख महेश राठोड,अभिषेक काळे,पांडुरंग मस्के,अमोल अघम, नागोराव चव्हाण,जयवंत बोळे,नंदकिशोर ठाकरे,रुपाली भाकरे यांनी कारवाई करून बंदी असलेला प्लास्टिक मुद्देमाल जप्त करून दंडात्मक कारवाई केली.सुरू असलेल्या कारवाई मुळे मात्र व्यावसायिक संभ्रमात पडला असून कारवाईची धास्ती घेतली आहे.