अकोला (प्रतिनिधी) – सिताबाई कला महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांक़डून अवैध प्रवेश शुल्काची वसूली सुरू असून शासनाकडून शिष्यवृत्ती येत नसल्याने २४०० रू घेतले जात असल्याने सम्यक विद्यार्थी आंदोलनने महाविद्यालयात धडक दिली.
ह्या वेळी प्राचार्य सिकची यांना भेटून अवैध प्रवेश शुल्क वसुली बंद न केल्यास सम्यक विद्यार्थी आंदोलनचे वतीने प्राचार्यांना काळे फासण्याचा ईशारा प्राचार्य सिकची यांना देण्यात आला. शासननिर्णया नुसार अ.ज., अ.जा., ईतर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक विद्यार्ध्यांकडून कोणतेही शुल्क घेतले जावू नये. तसेच ज्या विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतले त्यांचे पैसै तात्काळ परत करण्याची समजही ह्यावेळी देण्यात आली.
ह्यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनचे पदाधिकारी राजेंद्र पातोडे, सचिन शिराळे, नितेश किर्तक,
अमोल स. शिरसाट, धिरज इंगळे, राजकुमार दामोदर, रितेश कीर्तक, पवन गवई, सागर डोंगरे, योगेश कीर्तक, शेखर इंगळे, डुड सदांशिव, लकी वानखड़े, जीतू वानखड़े, आकाश वानखड़े,विक्की धोपेकर, आकाश बोरचाटे, मिहिर रामटेके, अभय डहाके, अर्णव सिरसाठ, अंकित इंगळे, अजित पाटिल, विवेक पांढरे, अभिषेक देवर, हिमांशु जैन, प्रशांत वानखड़े, अंकुश धुरंदर, मनोज अगमें, दर्शन वानखड़े, विशाल गायकवाड़, उमंग मेश्राम, भावेश खोकले, चिरंजीव पाटले, प्रशिक सदांशिव, बंटि वानखडे, रितेश यादव आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा : खूशखबर! करा ही गोष्ट, पंतप्रधान मोदी देणार 25 हजार