तेल्हारा (निलेश जवकार) – नगर परिषद तेल्हारा कडून पावसाळ्या पूर्वी करण्यात येणाऱ्या कामांना सुरुवात केली असून शहरातील नाले सफाईला सुरुवात झाली असून पावसाळ्या पूर्वी शहर अपडेट होत आहे.
शहरातील लहान मोठे अनेक सांडपाण्याचे नाले असून त्या मध्ये कचऱ्याचे ढीग जमा झाले होते. पावसाळ्यात या नाल्यामधून पावसाळ्याचे पाणी जावे जेणेकरून पूर परिस्थिती निर्माण होणार नाही.
मुख्याधिकारी मनोहर आकोटकर व नगराध्यक्ष जयश्री पुंडकर यांच्या आदेशाने तेल्हारा शहर अपडेट करणे सुरू आहे. दरवर्षी पावसाळा सुरू होण्या अगोदर नाले सफाई करणे आवश्यक असते कारण शहरात रोगराई व अस्वच्छता पसरू नये असा त्यामागचा उद्देश असतो. जेमतेम पावसाळा सुरू झाल्याने त्या आधी नाले सफाई सुरू केल्याने शहरवाशी समाधान व्यक्त करीत आहे.
अधिक वाचा : लाड कमिटीच्या शिफारसीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक नियुक्ती देण्यास हलगर्जीपणा करत असल्यामुळे आमरण उपोषण सुरु