• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home उत्सव

वटपौर्णिमा 2018 : जाणून घ्या वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व

Team OurAkola by Team OurAkola
April 30, 2020
in उत्सव, Featured
Reading Time: 1 min read
95 1
0
वटपौर्णिमा
14
SHARES
685
VIEWS
FBWhatsappTelegram

ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा. सावित्रीने यमधर्माशी चातुर्याने तत्त्वचर्चा करून आपल्या पतीचा म्हणजेच सत्यवानाचा प्राण परत आणला. शास्त्रातील या कथेचा आधार घेऊन भारतीय स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करतात व दिवसभर उपवास करतात.

मात्र आजकाल धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत आधुनिक स्त्रियांना हे सारे करणे शक्य नसते. म्हणूनच त्यावर तोडगा काढण्यासाठी वडाची फांदी घरी आणून त्याची पूजा केली जाते. मात्र यामुळे सणाचा मूळ हेतू तर दूरच राहतो उलट वटवृक्षांची छाटणी केल्याने वातावरणातील वायुप्रदुषणही वाढते.

हेही वाचा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

वटपौर्णिमेचे व्रत सुरू होण्यामागील पूर्वपीठिका :

यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. ही चर्चा वटवृक्षाच्या झाडाखाली झाली; म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रियांनी या व्रताची सुरुवात केली.

व्रताची देवता :

सावित्रीसह ब्रह्मा ही या व्रताची मुख्य देवता आहे.

विवाहित महिला वडाच्या झाडालाच का गुंडाळतात सूत ?

वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व :
वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी ईश्‍वराची पूजा करणे. कर्माला शिवाची जोड असेल, तर शक्‍ती व शिव यांच्या संयुक्‍त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जिवाला फायदा होतो.

वडाचे औषधी गुणधर्म :
निसर्ग सारेच मुक्तहस्ताने देत असतो मात्र ते मनुष्याला योग्यरित्या स्विकारण्याची गरज आहे. वडात औषधी गुणधर्म असल्याने शास्त्राप्रमाणेच आयुर्वेदातही या वृक्षाचे फार महत्त्व आहे. अनेक औषधांमध्ये वडाचा समावेश केला गेला आहे.

वडापासून बनवल्या जाणार्‍या तेलामुळे केसांचे आरोग्य सुधारते. सोबतच महिल्यांच्या आरोग्यासाठीदेखीलवड हे झाड अत्यंत फायदेशीर आहे.

मग यंदा कशी कराल वटपौर्णिमा साजरी ?

वड हे चिरतरूण झाड आहे. अक्षय म्हणजेच नाश न होणारे वडाचे झाड दीर्घायुषी असते. म्हणूनच आजच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्यासोबतच नवीन वटवृक्षाची झाडे लावण्याचा प्रयत्न करा.

सामान्यतः झाडं दिवसा ऑक्सिजन आणि रात्री कार्बन-डायऑक्साईड सोडतात. मात्र वडाच्या झाडांतून रात्रीदेखील प्राणवायूचाच पुरवठा होत असल्याने तुमच्या परिसरात वटवृक्षाचे झाड असणे हे आरोग्यास हितकारी आहे. म्हणूनच वडाच्या झाडांचे रोपण केल्यास तुमच्या पतीसोबतच परिवारातील इतर व्यक्तींचेही आरोग्य सुधारेल.

अधिक वाचा : वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशीच बायकोविरोधात ‘आंदोलन’,पुढच्या जन्मी ही बायको नको रे देवा

Tags: vatpornima 2018वटपौर्णिमा २०१८वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व
Previous Post

वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशीच बायकोविरोधात ‘आंदोलन’,पुढच्या जन्मी ही बायको नको रे देवा

Next Post

तेल्हारा शहर पावसाळ्या पूर्वी अपडेट करणे सुरू

RelatedPosts

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
Next Post
तेल्हारा

तेल्हारा शहर पावसाळ्या पूर्वी अपडेट करणे सुरू

नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी साठी कडक सुरक्षा; मंत्र्यांनाही सहज भेटणे अशक्य

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.