बायकोच्या जाचाला कंटाळून औरंगाबादच्या पुरुषांनी हे हटके आंदोलन केलं आहे. बायकोपासून लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी सर्व पुरुषांनी पिंपळाच्या झाडाजवळ यमाला विनंती करत पूजा केली. हे सर्व पुरुष पत्नीने दाखल केलेल्या केसेसमुळे वैतागलेले आहेत.
वटपौर्णिमेच्या एक दिवस आधीच यांनी हे आंदोलन का केलं? असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. त्याचं कारणही मजेशीर आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी यमराज व्यस्त असतील, त्यामुळे त्यांनी वटपौर्णिमेच्या एक दिवस आधी आंदोलन केल. तसेच पिंपळाच्या झाडाखाली मुंजा राहतो म्हणून त्यांनी आंदोलनासाठी वडाच्या झाडाऐवजी पिंपळाच्या झाडाची निवड केली.