दानापूर(सुनीलकुमार धुरडे)- येथील नारायणी देवी साह कनिष्ठ कला महाविद्यालय व सहकार विघा मंदिराच्या प्रांगणात हिरणाच्या पिल्लांचे प्राण वाचवत पिल्लांला वन विभागाच्य कर्मचाऱ्यांना सोपविण्यात आले. सविस्तर वृत्त असे की नुकत्याच शाळा महाविद्यालये सुरू झाली आहेत .आज सकाळी नारायणी देवी साह व सहकार विघा मंदिर च्या प्रांगणात एक हरिणीचे पिल्लू येथील बस चालक शे.राजु .शे.नबी यांना आढळून आले .हे पिल्लू कुञयांन पासुन आपला जिव वाचविण्याच्या प्रयत्नात महाविद्यालयाच्या प्रांगणात दाखल झाले .सदर चालु असलेला प्रकार बस चालक शे.राजु .शे.नबी याच्या निदर्शनास आल्यास त्यानी कुञया पासुन त्याचा जिव वाचवित प्राचार्य रविंद्र घायल यांना माहिती दिली . यावेळी सहकार विघा मंदिर व महाविलयाचे सर्व कर्मचारी शिक्षक वूंद यांनी शे.राजु यांना मदत करित पिल्लांला सुरक्षित ठिकाणी ठेऊन त्याला पाणी पाजले .या सर्व घटनेची माहिती प्राचार्य रविंद्र घायल यांनी अकोट वन विभागाला दिली .आर .एफ .ओ.श्री.कातखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली आ.रो. ए.एन.बावणे,बोर्डी बिट अकोट चे डि.ए.सुरजसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विकास मोरे ,दिपक मेसरे यांच्या कडे हरिणीचे पिल्लू देण्यात आले .