* कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची बियाणे खरेदी साठी वाढली गर्दी
* दमदार पावसाने बळीराजा सुखावला
अकोला(निलेश जवकार)- यंदा पावसाला उशीर झाल्याने बळीराज्याच्या चेहऱ्यावरचे नूर नाहीसे झाल्याचे दिसत होते मात्र गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसाला सुरुवात झाल्याने जिल्यातील बळीराजा सुखावला असून पेरणीच्या मागे तो आता लागला असून बियाणे खरेदीसाठी एकच लगबग त्याच्या मागे दिसून येत आहे.
यावेळी जिल्यात पावसाचे आगमन उशिराने झाल्याने जिल्यातील बळीराजा चिंतेत पडल्याचे चित्र होते.पेरणीला उशीर होत असल्याचे पाहून उत्पादनात पेरणी उशिरा केल्याने घट बसेल आधीच शेत मालाला भाव मिळत नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने तो पाऊस कधी होणार व पेरणी कधी होईल या चिंतेत असतांना गेल्या चार पाच दिवसापासून बळीराजाला हव्या तश्या पावसाला सुरुवात झाल्याने पेरणीच्या मागे लागला असून खते बियाणे घेऊन पेरणी करीत आहे.जिल्यात बऱ्याच तालुक्यात पेरणीला चांगली सुरुवात झाली असून येत्या काही दिवसात संपूर्ण जिल्यातील पेरणीचे काम पूर्ण होण्याचे चित्र दिसून येत आहे.