अकोला(प्रतिनिधी)-शेतकर्यांच्या ७x१२च्या उतार्या वरिल भू विकास बॅंकेचा बोजा त्वरित कमी न केल्या तिव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा अकोला जिल्हा शेतकरी संघटनेचे वतीने जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय याना एका निवेदनाद्वारे आज देण्यात आला.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट पाटील,पश्चिम विदर्भ प्रमुख धनंजय मिश्रा,सोशल मीडिया प्रमुख विलास ताथोड,विदर्भ युवा आघाडी प्रमुख डॉ निलेश पाटील ,शंकर कवर,संदीप पाटील महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्रात भू विकास बॅंकेने शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केले होते. कर्ज दिल्या नंतर , कर्जदार शेतकर्यांच्या ७x१२ च्या उतार्यावर भू विकास बॅंकेचे नाव कब्जेदार सदरी लावण्यात येत असे.
सन २०१४ साली महाराष्ट्रातील भू विकास बॅंक बंद केल्याची घोषणा करण्यात आली. बॅंकेचे पुनर्ज्जिवन करण्यासाठी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका ही फेटाळण्यात आली आहे. भू विकास बॅंक पुन्हा सुरु होणार नसली तरी अद्याप शेतकर्यांच्या ७x१२ च्या उतार्यावर बॅंकेचा बोजा नोंदविलेला आहे.
७x१२ च्या उतार्यावर बोजा दिसत असल्यामुळे, शेतकर्यांना सदर जमिनिवर कर्ज काढणे, गहाण ठेवणे, हस्तांतर करणे, खाते फोड करणे अथवा विकणे कामी अडचणी येत आहेत. शेतकर्यांचे आर्थिक व्यव्हार ठप्प झाले आहेत.
या निवेदनाद्वारे महाराष्ट्रातील ज्या शेतकर्यांच्या ७x१२ च्या उतार्यावर भू विकास बॅंकेचा बोजा नोंदविलेला असेल तो त्वरित कमी करण्याचे आदेश महसूल यंत्रणेला देण्यात यावेत.
शेतकर्यांच्या ७x१२ वरील बोजा तातडीने कमी न केल्यास शेतकरी संघटना या विषयी तिव्र आंदोलन हाती घेईल. राज्यातील शेतकर्यांची विनाकारण होणारी हेळसांड व अडवणुक लक्षात घेउन कर्जाचा बोजा कमी करण्याचे आदेश पारित करावेत
अन्यथा आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे वतीने या वेळी देण्यात आला आहे.