तेल्हारा(निलेश जवकार)- गाडेगाव ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांनी ग्रामपंचायती च्या कामकाजामध्ये व विकास निधीच्या वापरामध्ये मनमानी सुरू केली असून ग्राम पंचायत सदस्यांना विश्वासात घेतले जात नसल्यामुळे गाडेगाव ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी तेल्हारा पंचायत समितीचे बी.डी.ओ.यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.
शासनाकडून सरपंचांना थेट निवडणुकीमुळे मिळालेला अतिरिक्त अधिकाराचा दुरुपयोग गाडेगाव ग्राम पंचायत सरपंच प्रमोद वाकोडे करीत असून विकास कामे करतांना एकाकीपणा वापरून सदस्यांना विश्वासात न घेता कामे कामाची बिले व कामे मर्जीतील लोकांना देऊन विना निविदा केली जात आहे.कामाचा दर्जा निकृष्ठ असून अवाच्या सव्वा बिले काढली जात असल्याचा आरोप ग्राम पंचायत सदस्यांनी केला असून कामामध्ये पारदर्शकता नसून सदस्यांनी मागितलेली माहिती दिल्या जात नाही.असे पंचायत समिती बी.डी. ओ. यांना निवेदनाद्वारे दिलि.
सदर निवेदनावर ग्राम पंचायत सदस्य विजय बोर्डे,दादाराव वानखडे,शारदा हिगणकार, माधुरी वडतकर, कीर्ती पिंगळे,मंगला गवई, लक्ष्मण काळे,संदीप आवारे,संतोष तराळे, यांच्या सह्या असून सरपंच व सचिव यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी केली.संबंधितांवर योग्य ती कारवाई न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा ग्राम पंचायत सदस्या शारदा हिगणकार व इतर सदस्य यांनी यावेळी दिला.