• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला- खंडवा रेल्वेमार्गाच्या गेज परिवर्तनातील अडचणी दूर

Team OurAkola by Team OurAkola
April 30, 2020
in Featured, अकोला शहर
Reading Time: 1 min read
78 1
0
अकोला
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला-खंडवा रेल्वेमार्गाच्या गेज परिवर्तनातील अडचणी दूर

अकोला : अकोला- खंडवा रेल्वेमार्गाच्या रुंदीकरणाच्या कामातील वनविभागाचा तांत्रिक अडसर दूर करण्याचा निर्णय दिल्ली येथील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या मार्गाचा प्रश्न मार्गी लागला आहे. गेज परिवर्तनामुळे देशातील नऊ राज्य जोडली जाणार आहेत.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत सोमवारी दिल्ली येथील परिवहन भवन येथे रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे, केंद्रीय वने व पर्यावरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत अकोला-खंडवा रेल्वेमार्गाच्या गेज परिवर्तनातील अडचणी दूर करण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हद्दीतून जाणाऱ्या अकोला-खंडवा रेल्वेमार्गाच्या गेज परिवर्तनातील अडचणीवर चर्चा करण्यात आली. वन संवर्धन कायदा १९८० अस्तित्वात येण्यापूर्वीच अकोला-खंडवा हा रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्याने या कायद्यातून रेल्वेमार्गाला वगळण्यात आले आहे व गेज रूपांतरणास मंजुरी देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाल्याची माहिती अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी बैठकीनंतर दिली. आजच्या मंजुरीमुळे वन संवर्धन कायद्यामुळे परवानगी न मिळाल्याने बंद पडलेल्या अकोट ते आमला खुर्द या गेज रूपांतरणाच्या कामाला मंजुरी मिळाली असल्याचेही धोत्रे यांनी सांगितले. लवकरच या मार्गावरील गेज परिवर्तनाच्या कामास सुरुवात होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सध्या अकोला-अकोट मार्गाचे काम सुरू आहे. मात्र, पुढे अकोट ते खंडवा मार्गावरील अकोट ते आमला खुर्द हा भाग अमरावती व अकोला जिल्हय़ातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जात असल्याने या मार्गाच्या गेज परिवर्तनात केंद्रीय वने व पर्यावरण विभागाकडून तांत्रिक अडचण येत होती. त्यामुळे अकोट ते आमला खुर्द हे गेज परिवर्तनाचे काम रखडले होते, असेही खासदार धोत्रे यांनी सांगितले.

अकोला ते खंडवा गेज परिवर्तनाच्या कामात तांत्रिक अडचण दूर झाल्याने या कामास गती येऊन दीड ते दोन वर्षांत काम पूर्ण होणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वे अर्थसंकल्पात अकोला-खंडवा-रतलाम या ४७२ कि.मी. रेल्वे मार्गाच्या मीटरगेजहून ब्रॉडगेज करण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार रतलाम ते खंडवा रेल्वेमार्गाचे गेज परिवर्तन झाले आहे. नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक समितीने या मार्गाच्या गेज रूपांतरणाच्या कार्यास मंजुरी दिली असून यासाठी जवळपास १४२१ कोटी रुपये खर्च येणार आहे.

अधिक वाचा : कर्जमाफीनंतरही विदर्भात १२०० शेतकऱ्यांची आत्महत्या

Tags: अकोलाअकोला- खंडवाअकोला- खंडवा रेल्वेमार्गाच्या रुंदीकरणाच्या कामातील वनविभागाचा तांत्रिक अडसर दूरनितीन गडकरीसंजय धोत्रे
Previous Post

तेल्हा-यात अट्टल चोरट्याचा मेडिकल करतांना पोलीस व डॉक्टर वर जीवघेणा हल्ला

Next Post

कर्जमाफी, पीक कर्जवाटपाचा घोळ कायम

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
कर्जमाफी, पीक कर्जवाटपाचा घोळ कायम

कर्जमाफी, पीक कर्जवाटपाचा घोळ कायम

कर्जमाफी

कर्जमाफीनंतरही विदर्भात १२०० शेतकऱ्यांची आत्महत्या

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.