अकोट तालुक्यातील पारळा ग्रा.पं.च्या सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव पारीत
आकोट (प्रतीनीधी)-आकोट तालुक्यातील ग्राम पंचायत पारळा चे सरपंच विलास हिरुळकर यांचे विरुद्ध आविश्वास प्रस्ताव पारीत झाला आहे.त्यांच्या विरुद्ध ५ सदस्यांनी अविश्वास ठराव विश्वनाथ घुगे तहसीलदार अकोट यांचे समक्ष दिनांक ८ जून रोजी सादर केला होता. सदर ठरावावर तहसीलदार यांनी सरपंच व इतर ६ सदस्यांना दिनांक ८ जून रोजी दिनांक १४जून रोजी अविश्वास ठरावावर चर्चा करण्याकरिता विशेष सभेस हजर राहणे बाबत सूचित केले होते. त्यानुसार आज दिनांक १४ जून रोजी सकाळी ११ वाजता अविश्वास ठरावा कारणाने विशेष सभा घेण्यात आली.यात अविश्वास ठराव दाखल करणारे 5 सदस्य हजर असून सरपंच व 1 सदस्य गैरहजर होते. सभेत सूचक म्हणून दादाराव गवई,सदस्य ग्रा. प.पारळा यांनी ठराव सादर केला व इतर सदस्यांनी त्या ठरावाला अनुमोदन करून मान्यता दिली .त्यानंतर उपस्थित सदस्यांपैकी अविश्वास ठरावा कडून मतदान घेतले असता उपस्थित 5 सदस्यांनी ठराव मंजूर असल्याबाबत हात वर करून मान्यता दिल्याने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. सदर सभेस पि. एस. उखळकर, मधुकर काळे मंडळ अधिकार चोहोट्टा बाजार, सचिन म्हैसने तलाठी पारळा, ग्रामसेवक पारळा ग्रामपंचायत चे 5 सदस्य व निवडणूक विभागाचे संगणक चालक .सिद्धांत वानखडे हजर होते.
अधिक वाचा : ” एक दिवस शेतक-यांसोबत ” या उपक्रमाचे 30 जुन रोजी आयोजन