तेल्हारा पोलिसांच्या एका पाठोपाठ एक कारवाया
तेल्हारा( निलेश जवकार)- तेल्हारा पोलिसांनी गोमांस विक्री करणाऱ्या बहाद्दरांविरुद्ध कारवाईचा सपाटा लावला असून आज सकाळी टाटा सुमो चारचाकी गाडीमध्ये गोमांस घेऊन जाणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडून त्यांच्या तेल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यात गोवंश हत्या प्रतिबंधित कायद्याची पायमल्ली होत असताना तेल्हारा पोलिसांकडून गोमांस चा अवैध धंदा करनाऱ्या विरुद्ध धरपकड मोहीम राबविण्यात येत आहे.आज सकाळी ८.३० च्या दरम्यान पो उप निरीक्षक हर्षल चाफले,पो कॉ गणेश सोळंके,गजानन राठोड हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळालि की मुंडगाव मार्गे पाथर्डी कडे एक पांढऱ्या कलर ची टाटा सुमो गोमांस घेऊन एक जण येत आहे.त्यावरून पाथर्डी येथील गावाच्या कमानी येथे सापळा रचून सकाळी ९ वाजताच्या दरम्यान टाटा सुमो गाडी अडवून झडती घेतली असता गाडीमध्ये गोमांस आढळून आले.
त्यावरून अवैध मार्गाने गोमांस विक्री साठी घेऊन जाणाऱ्या चालक अनिल वामनराव ढोकन(३०)रा दहीहंडा,आरिफ उर्फ बल्लू चौधरी(३०)रा कसाई मोहल्ला दहीहंडा यांच्या ६० किलो गोमांस अंदाजे किंमत ७५०० रु व टाटा सुमो चारचाकी अंदाजे किंमत ७०,०००हजार असा ऐकून ७७५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध कलम ४२९ भांदवी सहकलम ५,५(क),९,९(अ)प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ व सुधारित गोवंश हत्या प्रतिबंध कायदा २०१५ नुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई तेल्हारा पो स्टे ठाणेदार सचिद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पो.उप निरीक्षक हर्षल चाफले,पो कॉ गणेश सोळंके,गजानन राठोड यांनी केली तेल्हारा पोलिसांकडून होत असलेल्या कारवाया मुले गोमांसाचा धंदा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Comments 1