मला हवे तर मी एका मिनिटात मुख्यमंत्री बनू शकते, परंतु मुख्यमंत्री बनण्याची आता त्यांची इच्छा नाही, कारण मला कोणत्याही बंधनात अडकायचे नाही, असं वक्तव्य भाजप खासदार हेमामालिनी यांनी केलं आहे. बांसवाडा येथील प्रवासादरम्यान त्या बोलत होत्या.
उत्तर प्रदेशच्या मथुरा येथून भाजपच्या खासदार झालेल्या प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी यांना प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्रीपदाविषयी प्रश्न विचारला. ‘मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली तर ती स्वीकारणार का?’ असे विचारता त्या म्हणाल्या, ‘मला मुख्यमंत्री बनण्याची हौस नाही, पण मला हवे तर मी एका मिनिटात मुख्यमंत्री बनू शकते, परंतु त्यामुळे मला मनाप्रमाणे कुठेही फिरता येणार नाही’. असे उत्तर हेमा मालिनी यांनी दिले.
हेमामालिनी म्हणाल्या, ‘मी मतदारसंघात खूप काम केलं आहे. मला कृष्णनगरी येथील बृजवासी लोकांसाठी काम करायला खूप आवडते.’ बॉलिवूडची ओळख हेमा मालिनी यांना खासदार बनण्यासाठीदेखील उपयोगी पडली, असंही त्या म्हणाल्या.
अधिक वाचा : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठीची अंतिम मुदत 31 ऑगस्ट पर्यंत
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola