तेल्हारा (शुभम सोनटक्के)- काल रात्री च्या मध्य रात्री तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठानेदार व त्याचे सहकारी यांना मिळालेल्या गोपनिय माहीतीवरून शहरातील जीजामाता नगरातील एका.राहत्या घरात छापा टाकला असता विदेशी दारू. व मोटर सायकल सह आरोपीला अटक करण्यात आली यामध्ये ६६१५०₹ मुद्देमाला जप्त करण्यात आला.
सविस्तर वुत्त असे आहे की तेल्हारा शहरातील जीजामाता नगरात राहनारा बिना परवाना विदेशी दारूची विक्री करून आपल्या राहत्या घरी साठवनूक करतो अश्या प्रकारच्या मिळालेल्या गोपनिय माहीतीवरून ठानेदार विकास देवरे व त्यांच्या सहकारी यांनी आरोपीच्या राहत्या घरी छापा.टाकला असता मध्यप्रदेशातील विदेशी दारू ३५० कॉटर कींमत ४११५० व आरोपीची दुचाकी एम एच १४ एफ क्यु ८५४७ कींमत अंदाजे २५००० रूपयांच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात येउन आरोपी सचिन जमालपुरे वय २४ वर्ष राहनार जीजामाता नगर अटक करण्यात आली त्यांच्या विरूध्द कलम ६५ ई नुसार कारवाई करण्यात आली सदर कारवाई तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे ,हे.कॉ. गनपत गवळी ,नांगोराव भांगे महादेव बहुराशी ,सागर मोरे, करनसिंह ठाकुर ,विजय राजनकर यांनी केली.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola