अकोट- प्रतिनिधी (कुशल भगत): अकोला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राकेश कला सागर ह्यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या जननी2 ह्या उपक्रमा अंतर्गत आज पोलिस कर्मचारी निलेश गाडगे ह्याने साकारलेल्या शांता बाई ने अकोट शहरात धूम केली, महिलांचे सबलीकरण व सक्षमीकरन खऱ्या अर्थाने करायचे असेल तर फक्त सांगून होणार नाही तर त्याला कृतीची जोड द्यावी लागेल हे ओळखून जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कला सागर व अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर ह्यांनी जननी कार्यक्रमा अंतर्गत प्रत्येक महिला पर्यंत जाऊन त्यांना कायदेशीर दृष्ट्या व सुरक्षेच्या दृष्टीने सक्षम करण्याचा सकारात्मक प्रयत्न सुरू केला आहे, त्या साठी जननी2 अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख व पोलीस उपनिरीक्षक राजेश जोशी ह्यांचे मार्गदर्शनाखाली आज अकोट तालुक्यातील येनार्या ग्राम केळीवेळी येथील सखाराम महाराज महाविद्यालयाच्या सभागृहात पोलीस कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या व सादर केलेल्या पथनाट्य चे आयोजन केले होते त्याला विद्यार्थिनीच्या भरगोस उपस्थिती लाभली, सदर पथनाट्य मध्ये महिला व मुलीवर होणारे अत्याचार व त्याला महिला व मुलींनी कसे सामोरे जाणे गरजेचे आहे ह्याचे महत्व पटवून देण्याचा यशस्वी प्रयत्न पोलिस कलाकारांनी केला पथनाट्य मध्ये मुलीच्या जन्मा पासून ते शेवट पर्यंत होणारे विविध अत्याचार व त्याला सक्षम पणे तोंड देण्या साठी काय उपाय योजना आवश्यक आहे ह्याचे ज्ञान पथनाट्यातील शांता बाई ने उपस्थित मुलींना देऊन त्यांचे मन जिंकले व पथनाट्यातील प्रत्येक प्रसंगानंतर मुलींनी जोरदार टाळ्या वाजवून जोरदार दाद दिली, पथनाट्य ची गरज व महत्व पोलिस उपनिरीक्षक राजेश जोशी यांनी मुलींना सुरवातीला समजावून सांगितले
शिकवणूक मुलींना दिली, सदर कार्यक्रमात सखाराम महाराज महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व पोलीस कर्मचारी यांची उपस्थिती होती