• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शेतात किटकनाशके , तणनाशके फवारतांना काळजी घ्या -जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेेेय यांचे आवाहन

Editor by Editor
May 22, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
87 1
0
शेतात किटकनाशके , तणनाशके फवारतांना काळजी घ्या -जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेेेय यांचे आवाहन
13
SHARES
629
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.09(प्रतिनिधी):- सदयस्थितीमध्ये जिल्हयातील शेतकरी पिक पेरणीचे काम करत आहे. शेतक-याकडून झालेल्या पिक पेरणीवर येणारे किड/ रोगावर किटकनाशके , तणनाशके, फवारणी करण्यात येत आहे. परंतू हे काम करितांना शेतकरी/ शेत मजूर यांच्याकडून योग्य ती काळजी घेण्यात येत नसल्याने किंवा त्यांना याबाबत योग्य ती माहिती नसल्याने केव्हाही कोणतीही दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे शेतात किटकनाशके, तणनाशके फवारतांना खालील प्रमाणे दक्षता घेतल्यास काही प्रमाणात दुर्घटनाचे प्रमाण कमी होऊ शकते त्यासाठी किटकनाशके , तणनाशके, फवारणी करण्यासाठी खालील उपाययोजना करण्यात याव्यात. असे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी कळविले आहे.
शेतात उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी विविध रासायनिक औषधे फवारतात, हेच रासायनिक औषधे शेतकरी शेतात, झाडांवर फवारतांना मुख्यत: तीन प्रकारे धोका निर्माण होऊ शकतो. रासायनिक औषधांचे , झाडांवर अत्यंत बारीक कण हवे बरोबर श्वासोच्छवासासोबत शरीरात जातात, फवारणी करीत असतांना त्वचेच्या संपर्कामधून तथा डोळयाव्दारे शरीरात जातात, फवारणी करतांना नकळत तोंडाव्दारे खातांना ,बीडी पितांना शरीरात जाऊ शकतात.
किटकनाशके वापरतांना सर्वसाधारणपणे घ्यावयाची काळजी-
गळके फवारणी यंत्र न वापरता ते दुरूस्त करून वापरावे, किटकनाशके फवारणी यंत्रात भरतांना सांडू नये यासाठी नरसाळयाच्या वापर करावा., तणनाशक फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा व तो पंप किटकनाशक फवारणीसाठी वापरू नये, किटकनाशक वापरतांना संरक्षक कपडे वापरावे, फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुऊन ठेवावे, झिजलेले, खराब झालेले नोझल्स बदलून घ्यावेत, किटकनाशकला हुंगणे किंवा त्याचा वास घेणे टाळावे. , फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब लाकडी दांडयाचा किंवा काठीचा वापर करावा,किटकनाशक पोटात जाण्याची शक्यता असल्याने फवारणीचे मिश्रण करतांना अथवा फवारणीच्यावेळी तंबाखू खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे, फवारणीचे काम पुर्ण झाल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुऊन खाणे, पिणे करावे, फवारणीच्यावेळी लहान मुले, जनावरे पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणापासुन दुर ठेवावे, उपाशी पोटी फवारणीन करता फवारणीपुर्वी न्याहरी करावी, फवारणी करतांना वापरलेली भांडी इ. साहित्य नदी, नाला किंवा विहीरीजवळ धुउू नयेत. तर धुतांना वापरलेले पाणी त्यात विषारी अवशेष असल्याने पडीक जमिनीत टाकावेत अथवा मातीत गाडावेत,किटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या वापरानंतर नष्ट करून टाकाव्यात , फवारणी करतांना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी त्यास तोंड लावून फुंकू नये अथवा हवा तोंडाने आत ओढू नये. त्यासाठी सोईस्कर तार, काडी किंवा टाचणी वापरावी, किटकनाशके फवारणीचे काम दर दिवशीआठ तासांपेक्षा जास्तवेळ करू नये. हे काम करणा-या प्रत्येक व्यकतीने ठरावीक कालावधीने डॉक्टरांकडून स्वत:ला तपासून घ्यावे, किटकनाशके फवारण्याचे काम करतांना वापरण्याचे कपडे स्वतंत्र ठेवावे व वेळोवेळी स्वच्छ धुऊन काढावेत, किटकनाशके अंगावर पडू नये म्हणून वा-याच्या विरूध्द दिशेने फवारणी करून नये, किटकनाशके मारलेल्या क्षेत्रावर गुरांना चरण्यास किमान 2 आठवडे जाऊ देऊ नये, जमिनीवर सांडलेले किटकनाशक हातानी न पुसता व त्यावर पाणी न टाकता ती माती /चिखल यांच्या सहाय्याने शोषून घ्यावेत व जमिनीत गाडून टाकाव्यात, डब्यांवरील मार्गदर्शक चिन्हांकडे काळजीपुर्वक लक्ष दयावे. लाल रंगाचे चिन्ह/ खुण असलेली औषधी सर्वांत अधिक विषारी असून त्यानंतर पिवळा , निळा व हिरवा असा क्रम लागतो.
विषबाधा झाल्याची लक्षणे व उपाय योजना
विषबाधा हि किटकनाशके / तणनाशके यांच्या त्वचेशी संपर्क अथवा पोटात गेल्यास होते. विषबाधा व इतर आजार यांचा लक्षणात बरेचदा साम्य राहु शकते.
विषबाधाची लक्षणे
अशक्तपणा व चक्कर येणे, त्वेचेची जळजळ होणे, डाग पडणे, घाम येणे, डोळयांची जळजळ होणे, पाणी येणे, अंधुक दिसणे, तोंडातुन लाळ गळणे, तोंडाची आग होणे, उलटी येणे, मळमळणे, हगवण होणे, पोटात दुखणे., डोळेदुखी, अस्वस्थ होणे, स्नायुदुखी , जीभ लूळी पडणे, बेशुध्द होणे, धाप लागणे, छातीत दुखणे , खोकला येणे.
विषबाधेची शंका असल्यास खात्री करा
रोग्याचा किटकनाशकांसह संपर्क आला होता काय ? , नेमके कोणते किटकनाशक वापरले? शरीरात किती गेले व केव्हो गेले? डॉक्टरांसाठी वरील माहिती महत्वाची आहे ?
विषबाधेनंतर तातडीने करावयाचे प्रथमोपचार
किटकनाशके/तणनाशके डोळयात उडाल्यास, तात्काळ डोळे स्वच्छ पाण्याने 5 मिनीटांपर्यंत पाण्याची धार सोडून धुवा. शरीरावर उडाले असल्यास 10 मिनिटे साबणाने स्वच्छ धुवा व दवाखान्यात न्या. , विषबाधेनंतर रोगी जर संपुर्ण शुध्दीवर असेल तरच त्याला उलठी करण्यास प्रवृत्त करा अन्यथा नाही व 3 चमचे बारीक लाकडी कोळसा भुकटी करुन अर्धा ग्लास पाण्यातुन पाला व लगेच दवाखान्यात न्या, विषारी औषध कपडयांवर उडाले असल्यास ते कपडे लगेच बदला व रोग्यास शक्य तितक्या लवकर दवाखान्यात पोहचवा..

*******

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Previous Post

शेतकरी आत्मघातग्रस्त कुटूंबातील महिलांनी निर्माण केलेल्या कापडी पिशव्या खरेदी करण्यासाठी ग्रामपंचायत माझोड यांचा पुढाकार

Next Post

पोलिस उपनिरीक्षक शरद माळी ह्यांना अकोट शहर पोलिसांनी दिला भावपूर्ण निरोप

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
पोलिस उपनिरीक्षक शरद माळी ह्यांना अकोट शहर पोलिसांनी दिला भावपूर्ण निरोप

पोलिस उपनिरीक्षक शरद माळी ह्यांना अकोट शहर पोलिसांनी दिला भावपूर्ण निरोप

जिओ इन्स्टिटयूट

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.