अकोला, (प्रतिनिधी):- जिल्हयातील जनतेला आपले विविध प्रकारचे आवश्यक दाखले आता ईमेलवर प्राप्त होणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात विविध विभागाच्या आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय , जिल्हा पोलीस अधिक्षक एम राकेश कलासागर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विदयापिठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, मनपा आयुक्त् जितेंद्र वाघ , अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हयामध्ये महा ई सेवा तसेच आपले सरकार सेवा केंद्रातून मिळणार महसुली प्रमाणपत्रे उदा. जात प्रमाणपत्र , नॉन क्रिमीलिअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, वय व अधिवास दाखला तसेच इतर महसुली प्रमाणपत्रे अर्जदार आता थेट त्यांच्या ईमेल प्राप्त करू शकतील.
एखादे महसुली प्रमाणपत्र मिळवितांना अर्जदाराला वारंवार महा ई सेवा अथवा आपले सरकार सेवा केंद्र आणि तहसिल कार्यालयात वारंवार भेट दयावी लागते यात अर्जदाराचा बराच वेळ व पैसा व्यर्थ जातो. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार आता अर्जदाराला त्याचे प्रमाणपत्र थेट त्यांच्या ईमेल प्राप्त करता येणारआहे.
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी अकोला संजय खडसे यांनी हा अभिनव प्रयोग केलेला आहे. यामुळे वेळेची बचत ,पैशाची बचत व मध्यस्थांकडून होणारी पैशाची लुट तसेच आपल्या सोईनुसार आपल्या अर्जदाराला कोठूनही प्रमाणपत्र डाऊनलोड व प्रिंन्ट करता येईल. या अभिनव उपक्रमाचा फायदा जनतेनी घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
येत्या विधानसभा अधिवेनशामध्ये जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी उत्कृष्ठ काम केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देण्याचा प्रसताव ठेवण्यात येणार आहे. यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
अधिक वाचा : अकोल्याच्या मयूर खरपकर यांचा लोकप्रिय गुगल सर्च संमेलनात सहभाग