तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा शहराजनिक असलेल्या गुणवंत महाराज कॅनॉल जवळ दुपारी 12 वाजेच्या दरम्यान भीषण अपघात घडला या अपघातात मिळालेल्या माहितीनुसार तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे की मालेगाव बाजार येथील तीन अल्पवयीन मुले हे दुचाकीने मालेगाव येथून तेल्हारा कडे येत होते विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक एम एच 30 बिडी 7158 यांचामध्ये जोरदार धडकीत दुचाकीवरील गणेश अतुरकर वय १७,साई वैष्णव वय १३,दर्शन वैष्णव १६ अशा तीन अल्पवयीन मुलांचा भीषण अपघातात मृत्यू झाला.आयशर ट्रक ड्रायव्हर घटनास्थळावरून फरार झाला असून तेल्हारा पोलीस पुढील तपास करीत आहेत.










