• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

Our Media by Our Media
February 17, 2026
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, विदर्भ
Reading Time: 1 min read
83 1
0
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
12
SHARES
597
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी) : – शहराच्या मध्यवर्ती भागातील टाऊन हॉल परिसर सध्या अवैद्य धंद्यांचे केंद्र बनल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भरदिवसा दारू अड्डे, गांज्याची विक्री तसेच संशयास्पद हालचाली सुरू असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. सार्वजनिक मालमत्ता असलेल्या या ठिकाणी बेकायदेशीर कृत्ये उघडपणे सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. टाऊन हॉलच्या शेजारीच असलेल्या क्रीडा संकुलात दररोज मोठ्या संख्येने युवक-युवती सरावासाठी येत असतात. क्रीडांगणात घाम गाळणाऱ्या तरुणाईसमोर काही अंतरावरच अवैध दारू व नशेच्या पदार्थांची देवाणघेवाण सुरू असल्याचे चित्र संतापजनक आहे. पालकवर्गाने याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली असून, “खेळाच्या मैदानावर येणाऱ्या मुलांच्या भवितव्याशी हा थेट खेळ आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते विशाल नांदोकार यांनी टाऊन हॉलमध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करण्याची मागणी केली होती. शहरात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शांत व सुरक्षित अभ्यासाची जागा उपलब्ध व्हावी, हा उद्देश होता. मात्र, त्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष झाल्याने आज तीच इमारत अवैद्य कृत्यांचे आश्रयस्थान ठरत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिकांच्या मते, सायंकाळी आणि रात्री उशिरापर्यंत येथे संशयास्पद गर्दी वाढते. काही वेळा किरकोळ वाद, आरडाओरड आणि भांडणेही होत असल्याचे सांगितले जाते. परिसरातील व्यावसायिक व रहिवासी यांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “आम्ही अनेकदा तोंडी तक्रार केली, पण ठोस कारवाई दिसली नाही,” असा आरोपही नागरिकांकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

नगर पालिका व स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सार्वजनिक मालमत्ता गुन्हेगारी प्रवृत्तींना खतपाणी घालत असल्याची भावना शहरात पसरली आहे. जर वेळेत कडक पावले उचलली नाहीत, तर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्रीडा संकुल, शैक्षणिक वातावरण आणि सभोवतालचा परिसर सुरक्षित ठेवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे, असे मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले. दरम्यान, शहरातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. टाऊन हॉल परिसरात तातडीने पोलीस बंदोबस्त वाढवून अवैद्य धंद्यांवर कारवाई करावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि इमारतीचा विधायक वापर—अभ्यासिका, वाचनालय किंवा युवकांसाठी उपयुक्त उपक्रम यासाठी निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी करण्यात येत आहे.

आता प्रश्न एकच—प्रशासन जागे होणार का?

टाऊन हॉल ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’ बनण्याआधीच कठोर कारवाई करून शहराची प्रतिमा व तरुणाईचे भविष्य वाचवणे आवश्यक असल्याचे मत सर्वत्र व्यक्त होत आहे.

Previous Post

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

Next Post

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
Next Post
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.