• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे होणार २०५ मेगा वॅट वीज निर्माण – ‘महावितरण’ चे अध्यक्ष लोकेश चंद्र

Our Media by Our Media
July 30, 2025
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, योजना, विदर्भ
Reading Time: 1 min read
89 1
0
शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे होणार २०५ मेगा वॅट वीज निर्माण – ‘महावितरण’ चे अध्यक्ष लोकेश चंद्र
13
SHARES
641
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० द्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. अकोला जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे २०५ मेगावॅट वीजनिर्मिती होणार असून, येत्या तिमाहीत हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. लोकसंवाद व पाठपुराव्यातून कामाला गती द्यावी, असे निर्देश ‘महावितरण’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी आज येथे दिले.

नियोजनभवनात आयोजित मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनीच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, ‘महावितरण’चे संचालक सचिन तालेवार, सौर सल्लागार श्रीकांत जलतारे आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

श्री. लोकेश चंद्र म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू झालेली ‘मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.०’ अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक ठरली आहे. जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे पुढील एक वर्षात १६ हजार मेगावॅट वीज शेतीला दिवसा पुरवठ्यासाठी मिळणार आहे. अकोला जिल्ह्यात ६३ उपकेंद्राच्या क्षेत्रात २०५ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण होणार आहेत.

जिल्ह्यात १२ प्रकल्प कार्यान्वित

सध्या जिल्ह्यात १२ ठिकाणी ५५ मेगावॅट सौर प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. त्याद्वारे १९ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजेचा लाभ मिळत आहे. उद्दिष्टानुसार उर्वरित काम पूर्णत्वास जाण्यासाठी टास्क फोर्सने पुढाकार घ्यावा. त्यासाठी लोकसंवाद व प्रबोधन करावे. सौर प्रकल्पांसाठी आवश्यक शासकीय व खाजगी जमीन उपलब्ध करून घेणे, भूसंपादन व सौर प्रकल्पांसाठी आवश्यक पायाभूत सेवेत सुधारणा आदी कामांना गती द्यावी, स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत याबाबत जागृती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

प्रकल्पांसाठी शासकीय जागा मिळवून देण्यात अकोला जिल्हा आघाडीवर आहे. शासकीय इमारतींवरील सौर-विद्युतीकरणातही गती देण्यात आली आहे. जिल्ह्यात ८५० इमारतींवर सोलरायझेशनसाठी प्रयत्न होत आहेत. त्याचप्रमाणे, मॉडेल म्हणून २८ गावांना सौर-ग्राम करण्याचाही प्रयत्न आहे. सौर निर्मिती प्रकल्पांद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी प्रकल्पनिर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वेगाने कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी सांगितले.

Previous Post

जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भावामुळे ,आदेश लागू

Next Post

जिल्हा परिषदेच्या उपकरातून अंमलबजावणी, मागासवर्गीय व्यक्ती व दिव्यांगांसाठी विविध योजना

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अकोला

जिल्हा परिषदेच्या उपकरातून अंमलबजावणी, मागासवर्गीय व्यक्ती व दिव्यांगांसाठी विविध योजना

अट्टल दुचाकी चोरट्यास अटक पोलिसांची कारवाई सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

अट्टल दुचाकी चोरट्यास अटक पोलिसांची कारवाई सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.