माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अडसूळ यांनी अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या उपाध्यक्षपदी धर्मपाल मेश्राम यांची नियुक्ती तर गोरक्षक लोखंडे आणि वैदेही वाढाण यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाचे उपाध्यक्ष आणि सदस्यांनीही आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.