• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महायुती सरकारच्या ‘महाराष्ट्र फर्स्ट, मराठी फर्स्ट’ धोरणाला मोठे यश, रोजगार निर्मितीवर भर

Our Media by Our Media
September 13, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
84 1
0
जागतिक आर्थिक परिषदेत साडेतीन लाख कोटींचे सामंजस्य करार
12
SHARES
604
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : महाराष्ट्रात काही महिन्यानंतर विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणूक जवळ येताच विरोधकांकडून (काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) राज्यातील रोजगार आणि गरिबीचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विरोधी पक्षांकडून जोरदार निशाणा साधला जात आहे. मात्र दुसरीकडे महायुती सरकार (भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) केंद्र सरकारकडून राज्यात गुंतवणूक आणणे व त्यातून रोजगार निर्मितीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करत आहे. वृत्तानुसार, महायुती सरकारच्या ‘महाराष्ट्र फर्स्ट, मराठी फर्स्ट’ धोरणाला मोठे यश मिळत आहे. अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे.

ऊर्जा क्षेत्र: एक गेम-चेंजर

पंप स्टोरेजसाठी 2.14 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यातील ऊर्जा क्षेत्रात क्रांती घडवून आणणार आहे. यामुळे 40,870 मेगावॅट अतिरिक्त वीज निर्माण होईल आणि 72,000 रोजगाराच्या संधी निर्माण होतील. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच ऊर्जा क्षेत्राशी संबंधित महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

वाहन आणि ऊर्जा क्षेत्राला मोठी चालना

राज्य सरकारने ऑटोमोबाईल आणि ऊर्जा क्षेत्रात 1.20 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. इस्रायली कंपनी टॉवर सेमीकंडक्टर आणि अदानी ग्रुप यांच्या महत्त्वा करार झाला असून त्यांच्याकडून पनवेल मधील तळोजा येथे सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यातून 5 हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत. टोयोटा किर्लोस्कर छत्रपती संभाजीनगर मधील ओरिक सिटीमध्ये इलेक्ट्रिक वाहन प्लांट उभारणार आहे. त्यातून सुमारे 9,000 नोकऱ्या निर्माण होणार आहेत.

उत्तर महाराष्ट्राला जोडणारी रेल्वे लाईन

मनमाड-इंदूर रेल्वे लाईन प्रकल्पासाठी केंद्र सरकारने 18,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या प्रकल्पात 30 नवीन स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यातून 1,000 हून अधिक गावे आणि 30 लाखांहून अधिक लोकसंख्येला रेल्वे नेटवर्कशी जोडता येणार आहे. रेल्वे सेवेच्या विस्तारामुळे या अविकसित भागात औद्योगिक नेटवर्कची स्थापना होईल.

नदी जोड प्रकल्प : उत्तर महाराष्ट्राला चालना

राज्य सरकारने नार-पार गिरणा नदी जोड प्रकल्पासाठी 7,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला गुजरातमधून अतिरिक्त पाणी मिळणार आहे. या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्यांना फायदा होऊन अंदाजे 50,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल.

Previous Post

लवकरच शेतकरी करतील विजेची शेती! उपमुख्यमंत्री फडणवीस यांची अपलातून कल्पना

Next Post

एमसीए, एमबीए, कृषी, नर्सिंगला यंदा फुल्ल डिमांड

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
admission

एमसीए, एमबीए, कृषी, नर्सिंगला यंदा फुल्ल डिमांड

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण जिल्ह्यात 14 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण जिल्ह्यात 14 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.