• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

“देश आणखी एका बलात्काराची वाट पाहू शकत नाही…”

Our Media by Our Media
August 20, 2024
in Featured, अकोला, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
101 1
0
सुप्रिम
15
SHARES
728
VIEWS
FBWhatsappTelegram

डॉक्टर आणि महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचे रक्षण करणे हा राष्ट्रीय हिताचा विषय आहे. देश काही पावले उचलण्यासाठी दुसऱ्या बलात्काराची वाट पाहू शकत नाही. वैद्यकीय व्यावसायिकांचे संरक्षण करण्यासाठी राज्यात कायदे आहे. परंतु ते या समस्या सोडवत नाहीत, प्राचार्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना अन्य कोणत्या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कशी काय नियुक्त केली गेली? या प्रकरणी तात्‍काळ गुन्‍हा दाखल झाला नाही. पीडितेचा मृतदेह उशिरा तिच्‍या पालकांच्या ताब्यात देण्यात आला पोलीस काय करत होते?, असे सवाल करत आज ( दि. २० ऑगस्‍ट) सर्वोच्‍च न्‍यायालयाने प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी पश्‍चिम बंगाल सरकारची झाडाझडती घेतली.

तोडफोड करणाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये कसे येऊ दिले?

कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज (दि. २० ऑगस्‍ट) सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्‍या खंडपीठासमोर सुनावणी झाली. कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्राचार्य काय करत होते? प्राचार्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना अन्य कोणत्या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कशी काय नियुक्त केली गेली? या प्रकरणी तात्‍काळ गुन्‍हा दाखल झाला नाही. पीडितेचा मृतदेह उशिरा तिच्‍या पालकांच्या ताब्यात देण्यात आला पोलीस काय करत होते? एक गंभीर गुन्हा घडला आहे, गुन्ह्याची घटना हॉस्पिटलमध्ये घडली आहे. या प्रकरणानंतर तोडफोड करणाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये कसे येऊ दिले?, अशी सवालांची सरबत्तीही करत सरन्‍यायाधीशांनी पश्‍चिम बंगाल सरकारची झाडाझडती घेतली.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

डॉक्टरांवर पश्चिम बंगाल सरकारने सत्ता गाजवू नये

या प्रकरणी आम्ही आमच्या हस्तक्षेपाचे आमचे व्यापक मापदंड सूचित करू. शांतताप्रिय आंदोलक पश्चिम बंगाल सरकारने दडपण्‍याचा प्रयत्‍न करु नये. डॉक्टर असोत वा नागरीक त्यांच्यावर राज्‍याने सत्ता गाजवू नये, असेही सरन्‍यायाधीशांनी यावेळी पश्‍चिम बंगाल सरकारला फटकारले.

तर आपण महिलांना समानता नाकारत आहोत

महिला सुरक्षे अभावी कामावरच जाऊ शकत नसतील तर आम्ही त्यांना समानता नाकारत आहोत, असे स्‍पष्‍ट करत कोलकाता बलात्‍कार आणि हत्‍या प्रकरणातील पीडितेचे नाव, छायाचित्रे आणि व्हिडिओ जर प्रसारित होत असतील तर ही अत्यंत चिंतेची बाब आहे. आपण जीव गमावलेल्या तरुण डॉक्टरला हाच सन्मान देतो का?, असा सवालही सरन्‍यायाधीशांनी केला.

डॉक्‍टरांच्‍या सुरक्षेच्‍या उपायांसाठी राष्ट्रीय टास्क फोर्स

वरिष्ठ आणि कनिष्ठ डॉक्टरांच्या सुरक्षेच्या उपायांसाठी आम्ही राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापना करत आहोत. देशभरात ज्या पद्धतींचे पालन केले पाहिजे त्या शिफारशी द्याव्यात या फोर्सने द्‍यावात, आम्ही डॉक्टरांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी येथे आहोत, म्हणून आम्ही डॉक्टरांना कळकळीची विनंती करतो की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवावा. ही काही विशिष्ट प्रकरणांची बाब नाही, परंतु संस्थेला प्रभावित करणारी गोष्ट आहे. संपूर्ण देशाची आरोग्य सेवा महत्‍वाची आहे, असेही सरन्‍यायाधीशांनी यावेळी स्‍पष्‍ट केले. डॉक्टरांच्या सुरक्षेच्या उपायांसाठी आम्ही राष्ट्रीय टास्क फोर्समध्‍ये सर्जन व्हाइस ॲडमिरल आर सरीन, डॉ डी नागेश्वर रेड्डी, डॉ एम श्रीनिवास, डॉ. प्रतिमा मूर्ती, डॉ गोवर्धन दत्त पुरी, डॉ सौमित्र रावत, प्रा. अनिता सक्सेना, प्रमुख कार्डिओलॉजी, एम्स दिल्ली, प्रा. पल्लवी सप्रे, डीन ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई, डॉ पद्मा श्रीवास्तव, न्यूरोलॉजी विभाग, यांचा समावेश असेल त्‍याचबरोबर राष्ट्रीय टास्क फोर्सचे पदसिद्ध सदस्य हे केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव, गृह सचिव, आरोग्य मंत्रालयाचे सचिव, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष, राष्ट्रीय परीक्षक मंडळाचे अध्यक्ष यांचा समावेश असेल, असेही खंडपीठाने यावेळी स्‍पष्‍ट केले.

राष्ट्रीय टास्क फोर्सने तीन आठवड्यात अंतरिम अहवाल सादर करावा

राष्ट्रीय टास्क फोर्सने अंतरिम अहवाल तीन आठवड्यांमध्‍ये तर अंतिम अहवाल आदेशाच्या तारखेच्या 2 महिन्यांच्या आत सादर करावा, अशी विनंतीही खंडपीठाने केली आहे. सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या आरोग्य विभागातील सचिवांमार्फत आणि केंद्र सरकारने आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांमार्फत राज्ये आणि केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्व रुग्णालयांची माहिती खालील बाबींवर एकत्रित करणे आवश्यक. प्रत्येक रुग्णालयात किती सुरक्षा व्यावसायिक कार्यरत आहेत, प्रवेश करताना सामानाची तपासणी आहे का, डॉक्‍टरांसाठीच्‍या विश्रांती खोल्यांची संख्या, रुग्णालयातील सर्व भागात सीसीटीव्‍ही कार्यरत आहेत का, हॉस्पिटलच्या बाहेर पोलिस चौक्याची स्‍थिती, आदींची माहिती यामध्‍ये असावी, असेही सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

सीबीआयसह राज्‍य सरकारला अहवाल सादर करण्‍याचे आदेश

या प्रकरणी सीबीआयने गुरुवार, २२ ऑगस्‍ट रोजी स्टेटस रिपोर्ट दाखल करावा, तसेच हॉस्पिटलमध्ये झालेल्या तोडफोड प्रकरण तपासाच्या अहवाल प. बंगाल सरकारने 22 ऑगस्टपर्यंत सादर करावा, असा आदेशही खंडपीठाने दिला. आरजी कार मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये ९ ऑगस्टच्या मध्यरात्री एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी हा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला होता. या घटनेविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली. डॉक्‍टरांनी तीव्र निदर्शने करत काम बंद आंदोलन सुरु केले. कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास पश्‍चिम बंगाल पोलिसांकडून केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) हस्तांतरित केला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली हाेती.

Previous Post

जिल्हा होमगार्ड भरतीसाठी 22 ऑगस्टपासून चाचणी

Next Post

जर्मनीत नोकरीच्या विविध संधी इच्छूकांसाठी जर्मन भाषेच्या प्रशिक्षणासाठी अकोला येथे भरणार वर्ग

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
PLI Scheme

जर्मनीत नोकरीच्या विविध संधी इच्छूकांसाठी जर्मन भाषेच्या प्रशिक्षणासाठी अकोला येथे भरणार वर्ग

Weather Forecast

राज्यात उद्यापासून धुवांधार पाऊस...! या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.