• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

SC आणि ST आरक्षणाचा लाभ फक्त एकाच पिढीला मिळावा – सर्वोच्च न्यायालयाचे मत

Our Media by Our Media
August 2, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
112 2
0
Supreme-Court
16
SHARES
816
VIEWS
FBWhatsappTelegram

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अनुसूचित जातींच्या (SC) आरक्षणात उपवर्गीकरणाला मंजुरी दिलेली आहे. सामाजिक आणि आर्थिक मागसलेपणावर हे उपवर्गीकरण करता येणार आहे. तसेच SC आरक्षणातील १५ टक्के वाटा या सूचीतील जे मागास घटक आहेत, त्यांना मिळावा तसेच SC आणि ST (अनुसूचित जमाती) यांना आरक्षण देताना क्रिमलेअरची आखणी करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. याच निकालपत्रात न्यायमूर्ती पंकज मिथल यांनी एकाच पिढीला आरक्षणाचा लाभ मिळावा, असे मत व्यक्त केले आहे.

सात न्यायमूर्तींच्या पीठाने दिला निकाल

सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींच्या पीठाने हा निकाल दिला आहे. ६ विरुद्ध १ असा हा निकाल आहे. हा निकाल देताना न्यायालयाने २००४चा निकाल रद्दबातल ठरवला. न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड, बी. आर. गवई, विक्रम नाथ, बेला त्रिवेदी, पंकज मित्तल, मनोज मिश्रा आणि एस. सी. शर्मा यांच्या पीठाने हा निकाल दिला. बेला त्रिवेदी यांनी २००४चा निकाल राज्यघटनेशी सुसंगत असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

SC आणि ST आरक्षणाला क्रिमीलेअरबद्दल सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?

या निकालपत्राचे लेखन सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केले आहे. क्रिमी लेअर लागू करण्याचे मुख्य कारण म्हणजे सरकारी नोकर आणि सामाजिक-आर्थिक पातळीवर ज्या घटकांनी प्रगती केली आहे, अशांची मुलं आणि ज्यांना चांगले शिक्षण मिळत आहे, अशांना ते आरक्षणासाठी पात्र नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने सुचवले आहे.

क्रिमी लेअरबद्दल न्यायमूर्ती मिथल यांचे मत काय?

यामध्ये न्यायमूर्ती मिथल यांनी क्रिमी लेअरबद्दल वेगळा मुद्दा मांडला आहे. ते म्हणतात, “आरक्षण हे एका पिढी पुरते किंवा आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या पहिल्या पिढीपुरते मर्यादित असले पाहिजे. एखाद्या पिढीतील कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल आणि एक उंची गाठली असेल तर पुढच्या पिढीला आरक्षणाचा लाभ मिळू नये, हे तर्क सुसंगत आहे.”

राजकारण्यांच्या मर्जीवर आरक्षण ठरू नये – सरन्यायाधीश

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी उपवर्गीकरण करताना तो इंपिरिकल डेटावर असला पाहिजे आणि न्यायालयात अव्हान देताना त्याचे पुरेसे कारण दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. “राजकारण्याच्या मर्जीवर अवलंबून नसले पाहिजे. उपवर्गीकरण करताना त्याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे,” असे त्यांनी म्हटले आहे.

Previous Post

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कसा राहील पाऊस ?

Next Post

दिल्‍लीतील कोचिंग सेंटर्स बनली आहेत ‘डेथ चेंबर्स’ : सर्वोच्‍च न्‍यायालय

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
Supreme-Court

दिल्‍लीतील कोचिंग सेंटर्स बनली आहेत 'डेथ चेंबर्स' : सर्वोच्‍च न्‍यायालय

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी

दिव्यांगांना मिळणार उपयुक्त साधने प्रत्येक तालुक्यात मोजमाप शिबीर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.