• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जिल्ह्यातील जास्तीत-जास्त युवकांना संधी मिळावी – जिल्हाधिकारी अजित कुंभार

Our Media by Our Media
July 18, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, योजना, राज्य, विदर्भ, शिक्षण
Reading Time: 1 min read
193 2
0
जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ अभियान प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
28
SHARES
1.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१८ : जिल्ह्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत’जास्तीत-जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज केले.

राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’ ची नुकतीच घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर श्री. कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके व इतर अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’राज्यात राबविली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी अकोला जिल्ह्यात करण्याच्या दृष्टीने योजनेचा व्यापक प्रसार व प्रभावी संघटित प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

या योजनेंतर्गत रोजगार इच्छुक उमेदवारांना शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांसह उद्योग क्षेत्रातील कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे. १२वी उत्तीर्ण युवकांना प्रती महिना ६ हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. आय.टी.आय. तसेच पदविकाधारक युवकांना ८ हजार रुपये तर पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या युवकांना प्रती महिना १० हजार रुपये विद्यावेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

उद्योग, शासकीय, निमशासकीय आस्थापनांना या योजनेच्या माध्यमातून मनुष्यबळ मिळणार असून त्यांना शासनाच्यावतीने विद्या वेतन मिळणार आहे. यासाठी जिल्ह्यातील संबंधित आस्थापना व उमेदवारांना https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. तालुका स्तरावर व जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांसह उद्योग क्षेत्रातील कंपन्या आणि इच्छुक उमेदवारांची या योजनेसाठी नोंदणी होण्याच्या दिशेने संबंधित शासकीय यंत्रणांनी कार्य करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार महाराष्ट्राचा रहिवाशी व आधार नोंदणी असावी. उमेदवार एचएससी/आयटीआय,पदवीकाधारक तसेच पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेला, तसेच  http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केलेली असावी. शिक्षण सुरु असलेले उमेदवार या योजनेकरीता पात्र नाहीत. वय १८ ते ३५ वर्ष असावे. उमेदवाराचे स्वत:चे नावे बॅक खाते आधार संलग्न असावे. उमेदवाराचे कार्य प्रशिक्षण कालावधी हा ६ महिन्याचा राहील.  शिकाऊ उमेदवारी (NAPS/MAPS)पुर्ण केलेले व करीत असलेले उमेदवार पात्र राहणार नाहीत.

आस्थापना,उद्योग राज्यात कार्यरत असावा. उद्योगाची रोजगार विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी असावी. आस्थापना /उदयोगांनी EPF, ESIC, GST,Certificate of incorporation, DPIT  व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी, अशी माहिती श्री. शेळके यांनी दिली.

Previous Post

पंढरपूर : हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमली पंढरी!

Next Post

अबब…मुस्लिम बांधवांना अंत्यविधीकरिता करावा लागतो ट्रॅक्टरचा उपयोग, प्रशासनाचा हलगर्जीपणा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अबब…मुस्लिम बांधवांना अंत्यविधीकरिता करावा लागतो ट्रॅक्टरचा उपयोग, प्रशासनाचा हलगर्जीपणा

अबब...मुस्लिम बांधवांना अंत्यविधीकरिता करावा लागतो ट्रॅक्टरचा उपयोग, प्रशासनाचा हलगर्जीपणा

हिवरखेड तेल्हारा शेगांव खामगाव रेल्वे मार्गाचा सर्वे करा … केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव.

हिवरखेड तेल्हारा शेगांव खामगाव रेल्वे मार्गाचा सर्वे करा ... केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव.

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.