• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अपेक्षा वाढल्याने वधू-वर सूचक मंडळे हतबल मुलगी मिळत नसल्याने वरपिता चिंतेत

Our Media by Our Media
May 24, 2024
in Featured, अकोला, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
160 2
0
अपेक्षा वाढल्याने वधू-वर सूचक मंडळे हतबल मुलगी मिळत नसल्याने वरपिता चिंतेत
23
SHARES
1.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

नोकरी व स्थिरस्थावरच्या मागे लागल्यामुळे मुला-मुलींची लग्न जुळून येत नाहीत. त्यामुळे वाढते वय तसेच अव्वाच्यासव्वा अपेक्षा वाढल्यामुळे वधु-वर सूचक मंडळे व नाव नोंदणी केलेल्या वर पालकांनी अक्षरश: हात टेकले आहेत. त्यातच पै-पाहुण्यांकडून देखील अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने इच्छुकांच्या लग्नाचा खेळखंडोबा कायम आहे.

लग्नसराई सुरू आहे, लग्न जुळवण्याचा व्यवसायही तेजीत आहे असे म्हटले जाते. मात्र आज वधू-वर सूचक मंडळात नाव नोंदणी केलेल्या मुलींच्या पालकांकडूनच प्रतिसाद मिळत नसल्याचे मत अनेक वधू-वर चालकांनी व्यक्त केले. गेल्या तीन चार वर्षात विवाह नोंदणी संस्था तेजीत होत्या. मात्र वाढत्या अपेक्षामुळे आता विवाह नोंदणी संस्था समाजाकडून बदनाम होवू लागल्या आहेत. विवाह नोंदणी केलेला बायोडाटा देऊनही मुलींकडील मंडळी प्रतिसाद देत नाहीत. याला विवाह संस्था कशा काय जबाबदार आहेत, असा सवाल काहीजण उपस्थित करतात.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

एकेकाळी लग्न जुळवणे म्हणजे पुण्याचे काम समजले जात होते. मात्र आता त्याला व्यावसायिकतेचे स्वरुप आले आहे. मुला-मुलींची वाढती वये, लग्नाबाबतच्या अपेक्षा, नोकरदार मुलांची कमी संख्या, वेळेत लग्न जुळवण्यासाठी पालकांची व्याकुळता या सर्वांचा फायदा विवाह नोंदणी कार्यालयांना होत असून त्यातून हजारो रुपयांची उलाढाल होत आहे. त्यातून विविध पॅकेजेस करून काहीजणांकडून वधू-वर पालकांची लूट केली जात आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर कमी असला तरी उच्चशिक्षित मुलींची संख्या मात्र मुलांच्या तुलनेत जास्त आहे. त्यांच्या लग्नाविषयी भावी जोडीदाराबाबतच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. तर उच्चशिक्षित आणि स्थिरस्थावर मुलांची संख्या त्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे उपवर मुलांच्या पालकांमध्ये वधू संशोधनासाठी कसरत करावी लागत आहे. शहरासह ग्रामीण भागात असणार्‍या वधू-वर सूचक मंडळांचा सुळसुळाट वाढला आहे. नाव नोंदणी करताना ठराविक कालावधी व ठराविक सेवेच्या विविध पॅकेजचा फंडा या मंडळांकडून वापरला जात असतो. नाव नोंदणीसाठी आलेल्या वधू-वर पालकांना संस्थेचे दरपत्रक पुढे केले जाते.

हजारो रुपये खर्चून ठरलेल्या वेळेत लग्न जुळले नाही तर पुन्हा पैसे भरुन पुन्हा नोंदणी केली जाते. पूर्वी मुला-मुलींच्या लग्रासाठी स्थळ पाहताना कुटुंबातील मुख्य व्यक्तीला चपला झिजवाव्या लागत होत्या, आता घर बसल्या मोबाईलवर स्थळ शोधली जात आहेत. मात्र, त्यासाठी काही हजार रूपये देखील खर्चावे लागत आहेत. काही वर्षांपूर्वी पाहुण्यात पाहुणे होण्याची प्रथा होती. मुलगी नातेवाइकांच्या मुलाला देण्यास प्राधान्य दिले जायचे. मात्र, सध्या हा गोतावळा मागे पडत चाललाय. मुलगी पाहुण्यात नव्हे तर पाहुण्याच्या पाहुण्याला देण्यासही अपवाद वगळता कोणी उत्सुक नसल्याचे दिसते.

Previous Post

मद्याच्या नशेत तर्र अन्…! रईसजाद्याच्या कारनाम्यावर एक प्रकाशझोत

Next Post

IIT पास होऊनही 38 टक्के विद्यार्थी बेरोजगार..!

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
IIT पास होऊनही 38 टक्के विद्यार्थी बेरोजगार..!

IIT पास होऊनही 38 टक्के विद्यार्थी बेरोजगार..!

विदर्भात सूर्य आग ओकतोय…हवामान खात्याचा इशारा

पूर्व विदर्भ राज्यात सर्वात हॉट पारा ४५ अंशावर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.