• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या, २६ एप्रिलला देशात ८९ तर राज्यात ८ मतदारसंघात मतदान

Our Media by Our Media
April 24, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
84 1
0
election commission logo
12
SHARES
608
VIEWS
FBWhatsappTelegram

देशात लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील प्रचारतोफा आज (बुधवार) संध्याकाळी ५ वाजता थंडावल्या. २६ एप्रिलला देशभरात ८९ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ८ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, परभणी, नांदेड, हिंगोली या लोकसभा मतदारसंघांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश आहे. आठही लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुततीच्या उमेदवारांसह अपक्षांनीही प्रचारासाठी चांगलाच जोर लावला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रोड शो आणि रॅलीवर भर देण्यात आला. हिंसाचारप्रकरणावरुन देशभर गाजलेल्या मणिपूरच्या एका जागेसह दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र, आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, जम्मू-काश्मीर राज्यांमध्ये मतदान होणार आहे. तर केरळच्या सर्वच २० लोकसभा जागांवर मतदान होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधींसह दिग्गजांच्या सभा

दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या नेत्यांच्या सभा झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नांदेड आणि परभणी या दोन ठिकाणी सभा घेतल्या. राहुल गांधींनी नवनीत राणांच्या विरोधात अमरावती मतदारसंघात सभा घेतली अमित शाह यांचीही अमरावती, अकोला मतदारसंघात सभा झाली. या नेत्यांव्यतिरिक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांनीही या मतदारसंघांमध्ये सभांचा धडाका लावला होता.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

कसे आहे ५ मतदारसंघातील चित्र?

दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये विदर्भातील ५ तर मराठवाड्यातील ३ मतदारसंघांचा समावेश आहे. मराठवाड्यातील नांदेडमध्ये भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण, परभणीत ठाकरे गटाचे संजय जाधव विरुद्ध रासपचे महादेव जानकर, नांदेडमध्ये ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध शिंदेंचे बाबुराव कदम कोहळीकर अशा लढती होणार आहेत. तर विदर्भातील बुलढाण्यात ठाकरेंचे नरेंद्र खेडेकर विरुद्ध शिंदेंचे प्रतापराव जाधव विरुद्ध शेतकरी नेते रविकांत तुपकर अशी तिरंगी लढत आहे. अकोल्यातही तिरंगी लढत होत असून भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे अभय पाटील, वंचितचे प्रकाश आंबेडकर रिंगणात आहेत. तर यवतमाळ-वाशिममध्ये शिंदे गटाच्या राजश्री पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे संजय देशमुख, वर्ध्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे विरुद्ध भाजपचे रामदास तडस, अमरावतीत भाजपच्या नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखेडे असे सामने पाहायला मिळणार आहेत.

देशभरात दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीत हिंसाचार प्रकरणी देशभर गाजलेल्या मणिपूरमध्ये एका लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. केरळच्या सर्वच २० जागांवर मतदान होत आहे. तर कर्नाटकमध्ये १४ जागांवर मतदान होईल. राजस्थानमधील १३ जागांवर मतदान होणार आहे. लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यात ८ जागांवर मतदान होत असून यामध्ये मथुरा, मेरठ, गाझियाबाद, अलिगढ, अमरोहा, बागपत, गौतमबुद्ध नगर, बुलंदशहर या जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातही ८ जागांवर मतदान आहे. मध्यप्रदेशात ७ तर आसाम, बिहार या राज्यांमध्ये प्रत्येकी ५ जागांवर मतदान होत आहे. छत्तीसगड आणि पश्चिम बंगालच्या प्रत्येकी ३ जागांवर या टप्प्यात मतदान होणार आहे. उर्वरित त्रिपुरा, जम्मू-काश्मीर या ठिकाणी प्रत्येकी एका जागेवर दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे.

Previous Post

नितीन गडकरी यांना सभेत बोलताना भोवळ, कार्यकर्त्यांनी सावरले

Next Post

मतदारसंघात 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
मतदारसंघात 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग

मतदारसंघात 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग

heat sun hot weather

महाराष्ट्रासह पूर्व भारतात उष्णतेची लाट, मतदानावर परिणाम होण्याची शक्यता..

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.