• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सोने दराचा नवा उच्चांक, ग्राहकांना घाम फुटला, जाणून घ्या प्रतितोळ्याचा दर

Our Media by Our Media
April 16, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
222 3
0
सोन्याचे बिस्किट
32
SHARES
1.6k
VIEWS
FBWhatsappTelegram

सोन्याच्या दरात वाढ सुरुच आहे. आज मंगळवारी (दि.१६ एप्रिल) सोने दराने नवे शिखर गाठले. आज शुद्ध सोन्याचा दर ७०१ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ७३,५१४ रुपयांवर गेला. चांदीचा दरही प्रति किलो ८३,४५२ रुपयांवरून ८३,६३२ रुपयांवर पोहोचला. इराण- इस्रायल युद्धामुळे सोन्याच्या दरात वाढ होत असून एप्रिल महिन्यात आतापर्यंत सोने ४,५०० रुपयांनी महागले आहे.  इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, शुद्ध सोने म्हणजे २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ७३,५१४ रुपये, २२ कॅरेट ६७,३३९ रुपये, १८ कॅरेट ५५,१३६ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ४३,००६ रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर प्रति किलो ८३,६३२ रुपयांवर खुला झाला.

सोने दरवाढीचे कारण काय?

इराण- इस्रायल संघर्षामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले आहेत. यामुळे सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. भारतातील सोन्या-चांदीच्या किमती डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य यासह अनेक घटकांवर अवलंबून असतात. जागतिक स्तरावरील मागणीदेखील सोन्याच्या दराचा ट्रेंड ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या चिंतेमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून मागणी वाढली आहे. परिणामी सोन्याच्या दरात मंगळवारी वाढ झाली, असे रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

शुद्ध सोन्याची पारख कशी कराल?

सराफा बाजारात २४ कॅरेट हे शुद्ध सोने मानले जाते. पण, दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर होतो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे नमूद केलेले असते.

Previous Post

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस

Next Post

मतदार जागृतीसाठी मानवी साखळी अकोलेकरांना सहभागाचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन..

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने

मतदार जागृतीसाठी मानवी साखळी अकोलेकरांना सहभागाचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन..

Talathi Exam

स्पर्धा परीक्षेसाठी करंट अफेअर्स ची तयारी करताय ?

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.