• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, May 30, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

उधारीच्या पैशांसाठी लोकांनी तगादा लावू नये, म्हणून महिलेने रचला स्वत:च्याच घरात चोरी झाल्याचा बनाव

Our Media by Our Media
April 12, 2024
in Featured, अकोला, गुन्हा, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
98 1
0
crime
14
SHARES
705
VIEWS
FBWhatsappTelegram

जळगाव : उधार घेतलेल्या पैशांसाठी लोकांनी तगादा लावू नये म्हणून चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथील महिलेने वेगळीच शक्कल लढवली पण ही शक्कल या महिलेच्या आता अंगाशी आली आहे. या महिलेने घरामध्ये चोरी झाल्याचे दाखवून पोलिसांत खोटा गुन्हा दाखल केला. जेणेकरुन आता आपल्याला पैशांसाठी कोणी तगादा लावणार नाही. असा यामागे महिलेचा उद्देश होता. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये, हा चोरी झाल्याचा खोटा बनाव असल्याचे सिद्द झाल्याने व पोलीस यंत्रणेला वेठीस धरल्यामुळे मिनाबाई संतोष पडवळकर यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार द्वारे चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथे मीनाबाई संतोष पडवळकर या शेती करतात. दि. 5 रोजी त्यांनी पोलिसांना माहिती दिली की, व्यापाऱ्याला कापूस विकून मिळालेले रुपये दि. 4 ते 5 दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने घराचे कुलूप तोडुन, घरात शिरुन, घरातील लोखंडी कोठीतुन सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असे मिळुन २ लाख ४९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सदर गुन्हयाच्या घटनास्थळास अपर पोलीस अधिक्षक, कविता नेरकर, व सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, अभयसिंह देशमुख, यांनी भेटी देवून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्या करीता मार्गदर्शन करून तपास सुचना दिल्या होत्या. प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे, पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, पोहेकों युवराज नाईक व पोकों किरण देवरे हे तपास करीत असताना त्यांना तपासात सदर गुन्हयाचे फिर्यादी मीनाबाई पडवळकर यांच्या सांगण्यात व प्रत्यक्ष परिस्थीतीत तफावत दिसत होती. गुन्हयातील साक्षीदार फिर्यादी मीनाबाई पडवळकर यांच्या विसंगत येत होती. त्यामुळे मीनाबाई पडवळकर याच्या सांगण्याबाबत संशय बळावला.

पो.उप नि. कुणाल चव्हाण, पो.हवा. युवराज नाईक यांनी सदर गुन्हयाशी संबंधीत साक्षिदारांकडे सखोल विचारपुस केली. त्यावेळी साक्षिदारांचे सांगणेनुसार त्यांनी फिर्यादी मिनाबाई संतोष पडवळकर यांना शेतीकामासाठी वेळोवेळी उसने पैसे दिलेले होते. सदर पैसे त्यांना मिनाबाई संतोष पडवळकर यांनी त्यांचे शेतातील कापुस जानेवारी 2024 मध्ये विकला होता त्यावेळी परत केले होते. तरीही त्यांनी काही साक्षिदारांकडुन हात उसने घेतलेले अथवा उधारीचे पैसे परत केले नाही. त्यामुळे त्यांनी मिनाबाई संतोष पडवळकर यांचेकडे वारंवार त्यांचेकडुन घेतलेले उसने पैशाची मागणी केली. परंतू मिनाबाई संतोष पडवळकर यांनी प्रत्येक वेळी त्यांना तुमचे पैसे देते असे सांगुन वेळ मारुन नेत राहिल्या.

पहाटे उठल्या, स्वत:च्याच घराचे तोडले कुलुप

गावातील आणखी काही लोकांकडुन उसने घेतलेले पैसे व खते, बी बीयाण्यांचे उधारीचे पैसे परत देण्यासाठी त्यांचेकडे पैसे शिल्लक नव्हते. परंतु लोक त्यांचेकडे पैशासाठी तगादा लावत होते. त्यामुळे मिनाबाई संतोष पडवळकर यांना पैसे घेणाऱ्यांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी काही दिवसांचा अवधी पाहिजे असल्यामुळे त्यांनी दि. 05 रोजी फिर्यादी मिनाबाई यांनी स्वतः पहाटे लवकर उठून घराच्या दरवाजास लावलेले कुलूप तोडून घरात जावून तेथील सामान अस्ताव्यस्त करून त्यांच्या घरात चोरी झाल्याचा बनाव केला. जेणेकरुन त्यांचेकडे पैशासाठी तगादा लावणारे लोक त्यांचेकडे काही दिवस पैसे मागणार नाही असे गुन्हयाच्या तपासात निष्पन्न झाले, त्यामुळे सदर गुन्हयातील फिर्यादी यांनी चोरी झाल्याचा खोटा बनाव करुन पोलीस यंत्रणेला वेठीस धरल्यामुळे मिनाबाई संतोष पडवळकर यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसाकडून कारवाई होणार आहे.

खबरदार खोटी तक्रार द्याल तर

स.पो.नि. प्रविण दातरे, प्रभारी अधिकारी, चाळीसगाव ग्रामीण पो.स्टे. यांचेकडून चाळीसगांव व परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पोलीस जनेतेचे सेवेसाठी व त्यांना निर्माण होणाऱ्या अडी अडचणींचे कायदेशीर मार्गाने निराकरण करण्याकरीता २४ तास तत्पर आहेत. परंतू जर कुणी अशा प्रकारे स्वतःचे स्वार्थापोटी, वैमनस्यातुन अथवा इतर काही कारणांस्तव पोलीस स्टेशनला खोटी तक्रार देवुन खोटा गुन्हा दाखल करणे असा प्रकार केल्यास संबंधित तक्रारदार याचे विरोधात प्रचलित कायदयान्वये कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल.

Previous Post

काळजी घ्या..! महाराष्ट्रासह या पाच राज्यांना उष्णतेचा ‘ रेड अलर्ट ’

Next Post

पातूर येथे महायुती निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन व पक्षप्रवेश संपन्न

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
पातूर येथे महायुती निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन व पक्षप्रवेश  संपन्न

पातूर येथे महायुती निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन व पक्षप्रवेश संपन्न

राज्यातील या भागांत पाऊस, तर काही भागात तापमानाचा पारा वाढणार

राज्यातील या भागांत पाऊस, तर काही भागात तापमानाचा पारा वाढणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - ourakola@gmail.com

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.