• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

धक्कादायक! पोटच्या मुलीने प्रियकराच्या मदतीने संपविले आईला..

Our Media by Our Media
April 10, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, गुन्हा, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
128 1
0
crime news
18
SHARES
923
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे  : पहाटेच्या वेळी तरुणीने आपल्या प्रियकाराला घरी बोलावून घेतले. त्या वेळी तिची आई गादीवर झोपली होती. तिने घरातील हातोडा प्रियकराच्या हातात दिला. त्याने क्षणाचाही विलंब न करता तो हातोडा तरुणीच्या आईच्या डोक्यात मारला. वेदनेने कळवळून आईने ओरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी मुलीने स्कार्फने तिचे तोंड दाबले. काही क्षणात आई कायमची झोपली. पुण्यातील वडगाव शेरी परिसरात प्रियकराच्या मदतीने मुलीने आपल्याच आईच्या डोक्यात होताडा घालून स्कार्फच्या साहाय्याने तोंड दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

एवढेच नाही तर पोलिसांपासून वाचण्यासाठी दोघांनी महिलेचा खून केल्यानंतर ती बाथरूमध्ये घसरून पडली आणि तिच्या डोक्याला नळ लागला, असा बनाव रचला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात तिने आईच्या परस्पर तिच्या बँक खात्यावरून मित्राला ऑनलाईन पैसे पाठविले. ते पैसे वेळोवेळी काढले अन् खर्चही केले. पण, घटनेच्या दिवशी अचानक आई बँकेत जाऊ आणि पैसे काढू, असे म्हणू लागली अन् आता आपण पैसे काढत असल्याचे आईला कळणार आणि ती रागवणार या भीतीने मुलीने हे कृत्य केल्याचे पुढे आले आहे.
मंगल संजय गोखले (वय 45, रा. वडगाव शेरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

याप्रकरणी पोलिसांनी मुलगी योशिता संजय गोखले (वय 18) आणि तिचा प्रियकर मित्र यश मिलिंद शितोळे (वय 24, रा. गणेशननगर) यांना अटक केली आहे. याबाबत विनोद शाहू गाडे (वय 42, रा. चेंबूर, गोवंडी रोड, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 1 एप्रिल रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास चित्रलेखा निवास, राजश्री कॉलनी, लेन क्रमांक दोन, वडगाव शेरीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोखले कुटुंबीय मूळचे चेंबूरचे. गेल्या काही वर्षांपासून मंगल या मुलीला घेऊन पुण्यातील वडगाव शेरीत राहत होत्या. मंगल या घरकाम करत होत्या. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. योशिता हिचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. यश शितोळेचे आयटीआयचे शिक्षण झाले आहे. या दोघांची गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत.

दरम्यान, मंगल गोखले या काम करून पैसे जमा करत असत. त्या बँकेत पैसे ठेवत होत्या. याची माहिती मुलगी योशिता हिला होती. तिने मित्राला आणि तिला पैशाची आवश्यकता भासल्यास आईच्या बँक खात्यातून मित्र यश याच्या खात्यावर टाकत होती. तेथून ते पैसे काढून घेत. आईच्या बँक खात्यातूनही तिने वेळोवेळी चेकद्वारे पैसे काढले होते. काही महिन्यांत दोघांनी एक ते दीड लाख रुपये काढले होते. 1 एप्रिल रोजी योशिताला आईने पैशांची गरज आहे. उद्या आपण बँकेत जाऊ आणि पैसे काढू असे सांगितले. हे ऐकून योशिता घाबरली. तिला आपण आईच्या खात्यातून पैसे काढल्याची माहिती होणार आणि ती रागवणार, याची भीती वाटू लागली होती, त्यामुळे त्यांनी असे कृत्य केले.

असा काढला काटा

योशिताने 1 एप्रिल रोजी पहाटे साडेतीन वाजता याबाबतची माहिती यश याला दिली. त्याने आईला जिवे ठार मारू, असे सांगितले. मात्र, योशिताचा मावसभाऊ प्रणय हा मुंबईहून त्यांच्याकडे आला होता. तो घरात झोपल्याचे योशिताने यशला सांगितले. पहाटे पावणेचार वाजता यश हा योशिताच्या मोबाईलवर फोन करून प्रणय याला खाली बोलावून घेतले. साडेपाच वाजता यश एकटाच योशिताच्या घरी आला. त्या वेळी मंगल या गादीवर झोपल्या होत्या. योशिताने घरात ठेवलेला हातोडा यशच्या हातात दिला. त्याने तो मंगल यांच्या डोक्यात घातला. त्यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत योशिताने स्कार्फच्या साहाय्याने त्यांचे तोंड दाबले. मंगल यांचा मृत्यू झाल्यानंतर यश तेथून निघून गेला.

पोलिसी नजरेनं अचूक हेरलं

योशिताने रचलेल्या कहाणीबद्दल वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील यांना सुरुवातीपासूनच संशय होता. मंगल यांच्या डोक्यात झालेली जखम त्या पडल्याची खात्री देत नव्हती. त्यांनी योशिताला विश्वासात घेऊन चौकशी केली. मात्र, ती असे काही घडल्याचे सांगत नव्हती. दुसरीकडे नातेवाइकांकडे चौकशी केली, तर त्यांनी देखील आमचा कोणावर संशय नसल्याचे सांगितले. पोलिसांना तसे लेखीदेखील दिले. मंगल यांच्या उत्तरकार्यासाठी योशिता आणि तिचे सर्व नातेवाईक मुंबईला गेले होते. पाटील यांचे मन काही केल्याने ते मानायला तयार नव्हते. त्यांनी मंगल यांच्या नातेवाइकांना परत योशिताकडे विचारपूस करण्याची विनंती केली. त्या वेळी तिने कबूल केले. मात्र, कोणी आणि कसे केले हे सांगत नव्हती. पाटील यांनी योशिताला पुण्यात घेऊन येण्यास सांगितले. त्या वेळी तिने आईचा खून केल्याची कबुली दिली.

Previous Post

गोंदियात वादळी अवकाळीचा तडाखा विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Next Post

उष्णतेचा तडाखा कायम! हवामान खात्याचा ‘या’ भागात अवकाळी पावसाबाबत चिंतेचा इशारा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरणासह उष्ण रात्रींचे वातावरण

उष्णतेचा तडाखा कायम! हवामान खात्याचा 'या' भागात अवकाळी पावसाबाबत चिंतेचा इशारा

rain

गारपीटीसह अवकाळी पाऊस फळबागांचे नुकसान

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.